वाहतुकीची दररोज प्रचंड कोंडी....नागरिक हैराण
परळीत खासगी ट्रॅव्हल्सचा मुख्य रस्त्यावरच विळखा- रहदारीचा रोज खोळंबा ; बसस्थानका समोरील 'त्या' अनाधिकृत थांब्यांमुळे नागरिक त्रस्त परळी वैजनाथ (प्रतिनिधी): येथील बसस्थानक परिसरात खासगी ट्रॅव्हल्सने रस्त्यांवर अक्षरशः विळखा घातला असून, बसस्थानकासमोरच असलेल्या अनधिकृत थांब्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, अपघाताची भीतीही व्यक्त केली जात आहे. परळी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापार केंद्र आणि तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणि परिसरात खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी आपले बस्तान मांडले आहे. एसटी महामंडळाच्या बसला आत शिरताना आणि बाहेर पडताना या खासगी गाड्यांमुळे मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो.अनेकदा यातून प्रवाशांसोबत, नागरिकांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकारही घड...