शिक्षकांचे वेतन १४ एप्रिलपूर्वी अदा करा : मुप्टा संघटनेची मागणी




बीड | प्रतिनिधी

शिक्षक संघटना (मुप्टा), बीड जिल्ह्याच्या वतीने माहे मार्च २०२६ चे प्रलंबित वेतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी, म्हणजेच १४ एप्रिलपूर्वी अदा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बीडच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात शिक्षकांच्या दैनंदिन गरजा व आर्थिक अडचणी लक्षात घेता वेतन वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वेतन लवकर मिळाल्यास शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल, असेही संघटनेने स्पष्ट केले.

यावेळी मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर, जिल्हासचिव प्रा. शशिकांत जावळे, जिल्हाध्यक्ष प्रा. नारायण घोलप तसेच प्रा. प्रविण तरकसे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.शिक्षकांच्या या न्याय्य मागणीवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन वेतन अदा करावे, अशी अपेक्षा मुप्टा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार