नागापूर येथे उद्या 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर'



परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
महसूल उपविभाग परळी वैजनाथ आणि महसूल मंडळ नागापूर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नागापूर येथे 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' (टप्पा क्र. १) आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर श्री नागनाथ देवस्थान मंदिर सभागृहात संपन्न होईल.
या शिबिरामध्ये नागापूर तलाठी सज्जा अंतर्गत येणाऱ्या नागापूर, बहादूरवाडी आणि लिंबूटा या तीनही गावांतील नागरिकांच्या महसूल विषयक समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ एकाच छताखाली मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गटाच्या सदस्य आणि योजना दूतांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी मार्गदर्शन करणार असून, नागापूर, बहादूरवाडी आणि लिंबूटा येथील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, अशी विनंती मंडळ अधिकारी व ग्राम-महसूल अधिकारी (तलाठी) नागापूर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार