प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार
अंबाजोगाई शहर पोलिसांनी पकडली बियरची चोरटी वाहतूक करणारी कार
अंबाजोगाई, प्रतिनिधी
अंबाजोगाई शहर पोलिसांनी बियरची विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणारी कार बिअर च्या बॉक्स सह पकडली आहे. याप्रकरणी कार व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई शहरात मोंढा मार्केट कमानी समोर एक गजगा रंगाची ब्रेझा कार तिच्यामधून बियर विक्री करण्याच्या उद्देशाने बियर चे बॉक्स वाहतूक केले जात होते .ही कार व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कारसह मुद्दे मालाची अंदाजे किंमत 1 लाख 10 हजार दोनशे रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गोविंद येलमटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास पोहा सोळंके हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा