इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:शेतकऱ्यांना भेदभाव न करता सरसकट नुकसान भरपाई द्या - पंकजाताई मुंडे

 शेतकऱ्यांना भेदभाव न करता सरसकट नुकसान भरपाई द्या - पंकजाताई मुंडे


नांदेड जिल्हयात थेट बांधावर जाऊन केली अतिवृष्टीची पाहणी ; शेतकऱ्यांशी साधला संवाद



नांदेड दि. २० ------मराठवाडयात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला असून त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहण्याची आज खरी गरज आहे, त्यासाठी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विनाविलंब भेदभाव न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी. 'दसरा गेला, आता त्यांची 'दिवाळी तरी गोड करा' अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारकडे आग्रही मागणी केली.

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी  पंकजाताई मुंडे हया मराठवाडयाचा दौरा करत असून आज त्यांनी नांदेड जिल्हयातील धनगरवाडी ता. नांदेड, कारेगाव, पारडी ता. लोहा येथे  बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. रस्त्यावर पाहणी न करता त्यांनी थेट शेतापर्यंत जाऊन
संकटात सापडलेल्या बळीराजाशी संवाद साधत त्यांना धीर दिला.



  शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, शेतकरी सध्या आसमानी व सुलतानी अशा दोन्ही संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्याची व मदत करण्याची खरी गरज आहे. शेतकरी उपाशी राहू नये याची खबरदारी सरकारने घ्यावी तसेच पंचनामे करताना भेदभाव झाला नाही पाहिजे. शेतकऱ्यांच्या पिकांना विनाविलंब सरसकट नुकसान भरपाई द्यावी, त्यांचा दसरा गेला, आता दिवाळी तरी गोड करावी. शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी कसलीही चालढकल न करता राज्य सरकारने पुढे यावे तथापि, केंद्र सरकारचा विषय असेल तर त्यासाठी आम्ही  पाठपुरावा करू असेही त्या यावेळी म्हणाल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या