MB NEWS:पदवीधरांनो वेळीच जागे व्हा दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना काञज चा घाट दाखवा :-सिध्देश्वर मुंडे

 पदवीधरांनो वेळीच जागे व्हा ; राजकीय पक्षांच्या उमेदवारांना काञज चा घाट दाखवा :-सिध्देश्वर मुंडे




कळब,वाशी,भुम,परंडा,उस्मानाबाद,तूळजापुर,लोहारा,उमरगा येथील पदवीधरांसी साधला संवाद


उस्मानाबाद दि.24


पदवीधरांनो वेळीच जागे व्हा वेळ आजून गेलेली नाही दोन्ही पक्षाचे उमेदवार यांचा या पदवीधर निवडणुकीत प्रचंड मतांनी पराभूत करा व त्यांना काञजचा घाट दाखवल्या शिवाय शांत बसू नका अशा कडक शब्दात अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे यांनी दोन्ही पक्षाच्या उमेदवार यांचा खरपुस समाचार घेत टिका केली.


सध्या सिध्देश्वर मुंडे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत ते दि.23 व 24 रोजी उस्मानाबाद दौऱ्यावर होते. माता तुळजाभवानीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले व कळब,वाशी,भुम, परंडा, उस्मानाबाद, तूळजापुर, लोहारा व उमरगा येथील पदवीधरांसोबत बैठका घेत संवाद साधला.


पुढे बोलताना म्हणाले भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणजे फक्त निवडणूकीतच पदवीधरांना दिसतात ऐरवी कुठे असतात. मराठवाड्यातील पदवीधर ऐरणीवर सोडून देतात मंग यांना या निवडणुकीत मराठवाड्यातील पदवीधरांनी मतदान काय म्हणून द्यावे. या निवडणूकीत मराठवाड्यातील पदवीधर दोन्ही पक्षाचे उमेदवार यांना परभूत करून काञजचा घट दाखवल्या शिवाय गप्प बसणार नाहीत विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.


मुंडे यांचे उस्मानाबाद जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आले.उस्मानाबद दौऱ्यात पदवीधरांनी अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे यांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार