दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाने मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व हरपले* *_पंकजाताई मुंडे यांची भावपूर्ण श्रध्दांजली_*

 *भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाने मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व हरपले*



*_पंकजाताई मुंडे यांची भावपूर्ण श्रध्दांजली_*


परळी । दिनांक २४ ।

माजी सनदी अधिकारी तथा परळीचे भूमिपुत्र भुजंगराव कुलकर्णी यांच्या निधनाने मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.


मराठवाडयातील पहिले आयएएस अधिकारी, वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माझ्या परळी तालुक्याचे भूमिपुत्र गाढे पिंपळगाव येथील मुळ रहिवासी असलेले भुजंगराव कुलकर्णी यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली. अतीव दुःख झाले, मराठवाडयाच्या विकासाची तळमळ असणारे व्यक्तीमत्व हरपले, त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

••••

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....