इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-धोकादायक: वापरलेले पीपीई कीट आणि मास्क फेकले जातायत उघड्यावर, नागरिकांचे आरोग्य प्रचंड धोक्यात(video)

 धोकादायक: वापरलेले पीपीई कीट आणि मास्क फेकले जातायत उघड्यावर, नागरिकांचे आरोग्य प्रचंड धोक्यात




परळी वैजनाथ, प्रतिनिधी : वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पीपीई किट उघड्यावर फेकल्याने हे धोकादायक होऊ शकते.कोरोनामुळे पीपीई कीट, हातमोजे, मास्कच्या कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढली आहे.

         परळीच्या कचरा संकलनात नंदागौळ रस्त्यावर रस्त्याच्या कडेला रूग्णालयांत वापरण्यात येणारे सुरक्षा उपकरणे फेकण्यात आली आहेत.वापरलेले पीपीई कीट, हातमोजे, मास्क यांचा खच पडल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. पीपीई किटचा कचरा निचरा जिथल्या तिथे झाला पाहिजे परंतु हा कचरा रस्त्यावर येत असल्याने कोरोना काळात ही धोकादायक बाब आहे.याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.जैविक कच-याची विल्हेवाट प्रशासनाने नेमून दिलेल्या निर्देशांप्रमाणे लावणे बंधनकारक आहे. घातक कचरा उघड्यावर फेकणे गुन्हा आहे. 

                        ⬛ VIDEO⬛



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या