इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-पीक विम्यासाठी लाल वादळ बीडमध्ये..... *जिल्ह्याभरातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग*(Video)

 *पीक विम्यासाठी लाल वादळ बीडमध्ये.....


*जिल्ह्याभरातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग*


*बीड:दि 30 प्रतिनिधी*

अखिल भारतीय किसान सभा जिल्हा बीड च्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी गेल्या 2020 च्या खरीप हंगामा अखेरीस झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील पीकविमाधारक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने विमाप्रावधानातील अव्यवहार्य नियम व अटी लावून नुकसान भरपाई पासून वंचित ठेवल्याच्या नाराजीने व जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने आपले अवधान वेधून घेण्यासाठी बीड मध्ये निदर्शने करण्यात आले आले.

२०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पीकनुकसानीचे शासनाच्या महसूल विभागाने केलेले पीक पंचनामे केलेले आहेत व शेतकऱ्यांना मदत ही केली मात्र जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेले असताना महसूल विभागाने केलेले नुकसानीचे पंचनामे गृहीत धरून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा देण्यात यावा.तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणा-या अव्यवहार्य अटी शतींचा फेरविचार करून त्या वगळून ही योजना शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानाची भरपाई मिळण्यास सुलभ करावी.आदी मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली यावेळी किसान सभेचे नेते कॉ.एड.अजय बुरांडे, कॉ.दत्ता डाके,कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.मोहन लांब आदीसह जिल्ह्यातील किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी किसान सभेच्या शिष्ट मंडळाशी चर्चा करून राज्य शासनाच्यावतीने या बाबतीत लक्ष्य देऊन शेतकऱ्यांवर पीक विमा संदर्भात अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले.


जिल्ह्याभरातील हजरो शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होऊन रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर शेतकऱ्यांच्या घोषणा व हातातील लाल झेंडे बिडकरांचे लक्ष्य वेधून घेतले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या