इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS- *सोन्याचे बिस्किट मिळविण्याच्या नादात अंगावरचे सगळे दागिने दिले काढून* _*परळी येथील आठवडी बाजारातील प्रकार*_

 सोन्याचे बिस्किट मिळविण्या च्या नादात अंगावरचे सगळे दागिने दिले काढून !



 _*परळी येथील आठवडी बाजारातील प्रकार*_

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        सोमवार आठवडी बाजारातून काल दिनांक 26 रोजी बाजार करून आपल्या घराकडे निघालेल्या एका महिलेला रस्त्यात पडलेले दोन सोन्याचे बिस्किट दिसले. त्यापैकी एक तिने उचलून घेतले. त्यानंतर पाठीमागून आलेल्या एका इसमाने ते बिस्कीट मागितले. बिस्किटाच्या बदल्यात तुमचे दागिने द्या असे म्हणल्यावर या महिलेने आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून दिले असल्याचा  प्रकार घडला आहे. आपल्याला भुरळ पाडून हे दागिने लंपास केल्याचे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

        याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुनिता नवनाथ गित्ते वय 50 वर्षे राहणार वडसावित्री नगर ही महिला बाजारातून घराकडे जात असताना रस्त्यात दोन सोन्याची बिस्किटे तिला दिसून आली. यापैकी एक बिस्किट तीने उचलून घेतले. तिच्या पाठीमागून एक इसम आला व त्याने दुसरे बिस्किट उचलून घेतले. आयसी आयसीआय बँकेच्या रस्त्यावर असताना या इसमाने महिलेचा पाठलाग करत तिला गाठले व माझे सोन्याचे बिस्किट परत द्या अशी मागणी करू लागला. या महिलेला बोलत असताना सिगरेट ओढत त्याचा धूर या महिलेच्या तोंडावर त्याने सोडला त्यामुळे आपल्याला भुरळ पडली व अंगावरील 17 ग्रॅम सोन्याचे दागिने काढून दिल्याचे फिर्यादीत महिलेने म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चव्हाण हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या