दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-*बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार देवस्थानाचा होणार कायापालट; पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर यांचा पुढाकार* *कपिलधार तिर्थक्षेत्र विकासाचा 100 कोटी रुपयांचा विकास आराखडा नव्याने सादर करा - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला आदेश* *पूर्वी सुरू असलेल्या 11 कोटींच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार; त्वरित चौकशी करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्याचे ग्रामविकासमंत्र्यांचे निर्देश*

 *बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार देवस्थानाचा होणार कायापालट; पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर यांचा पुढाकार*

*कपिलधार तिर्थक्षेत्र विकासाचा 100 कोटी रुपयांचा विकास आराखडा नव्याने सादर करा - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला आदेश*



*पूर्वी सुरू असलेल्या 11 कोटींच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार; त्वरित चौकशी करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्याचे ग्रामविकासमंत्र्यांचे निर्देश*


मुंबई (दि. 15) ---- : संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार देवस्थानचा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून व शिवा, अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या मागणी व पाठपुराव्यानुसार कायापालट होणार आहे. 


येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा निर्माण करणे व पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा विकास आराखडा तातडीने तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज झालेल्या मुंबईत त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिले . 


ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात यासंबंधी बैठक पार पडली, या बैठकीस ना. मुश्रीफ यांच्यासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे तसेच ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी व शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


कपिलधार येथील मंदिरातील दर्शन रांग सुरळीत व्हावी, यासाठी बाजूच्या डोंगराची कडा कापून दर्शन रांग विकसित करण्यात यावी, या बाबीचा समावेश देखील नव्या आराखड्यात करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.


*मागील 11.26 कोटींच्या निकृष्ट कामाची होणार चौकशी*


मागील सरकारच्या काळात कपिलधार येथील विकासकामांसाठी ग्रामविकास विभागाने 11.26 कोटी रुपये निधी दिला होता, परंतु संबंधित कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शिवा संघटनेने केली होती.


या तक्रारीची दखल घेत हे काम करणाऱ्या कंत्राटदार व अन्य संबंधितांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. याशिवाय जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत त्यात मागणीनुसार बदल करण्याच्या सूचना ही करण्यात आल्या.


दरम्यान श्री. मन्मथ स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या व डोंगर दऱ्यातील नयनरम्य पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कपिलधार देवस्थानाच्या विकासासाठी पुढाकार घेऊन सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर व शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

  1. बहोत बढीया खबर ,
    समस्त वीरशैव लिंगायत समाजासाठी तथा वीरशैव सांप्रदायातील समाज बांधवांसाठी आनंदाची बातमी !!!!

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान, श्री क्षेत्र कपिला धार तीर्थ विकास करण्याची गरज लक्षात घेऊन शिवा संघटना करत असलेल्या पाठपुरावा मुळे शासन स्तरावर विचार होऊन १००कोटीची तरतूद होत असलेबद्दल खुप आनंद होत आहे.मा. श्री मनोहर धोंडे सरांचे खुप मोठे योगदान व मा.ना.धनंजयजी मुंढे साहेब,मा.आ. संदीप क्षीरसागर साहेब यांचे खुप आभार व धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....