इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-*वारकरी संप्रदायातील गुणवान गायक भजनी ह.भ.प. महादेव महाराज गोपाळे यांचा जन्मभूमीत गौरव*

 *वारकरी संप्रदायातील गुणवान गायक भजनी ह.भ.प. महादेव महाराज गोपाळे यांचा जन्मभूमीत गौरव*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      परळी व परिसरात एक निष्ठावान वारकरी भजनी ववारकरी संप्रदायातील गुणवान गायक भजनी म्हणून ओळख असलेल्या ह.भ.प. महादेव महाराज गोपाळे यांचा मालेवाडी या त्यांच्या जन्मभूमीत गौरव करण्यात आला.

      गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायात निष्ठेने भजनानंद सेवा करणारे ह.भ.प. महादेव महाराज गोपाळे हे अतिशय गुणवान गायक भजनी म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची साथसंगत त्यांनी केलेली आहे.मालेवाडी यथे नुकताच त्यांच्या कार्याचा गौरव पार पडला. मालेवाडी या जन्मभूमीत ह.भ.प.महादेव महाराज गोपाळे याचा गुणगौरव सोहळा झाला ही विशेष बाब ठरली आहे.  ह.भ.प प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते गोपालळे महाराज यांचा  गुणगौरव व गावातर्फे  पूर्ण आहेर व शाल श्री फळ देऊन 31000 हजार रुपये मानध देऊन त्यांना गौरविण्यात आले.तसेच श्री. भुराज बदने यांनी पूर्ण आहेर व 5100 रुपये  मानधन प्रदान केले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या