इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-सोयाबीन चोरीला गेल्याचा धक्का बसल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

  सोयाबीन चोरीला गेल्याचा धक्का बसल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू 

अंबाजोगाई -  सोयाबीनचे कट्टे चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्का बसल्याने वरपगाव येथील वयोवृद्ध शेतकरी रावण बाबुराव रिटरकर (वय ८०) यांनी मागील तीन दिवसापासून अन्न त्यागले होते. अखेर बुधवारी (दि.०९) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

      अंबाजोगाई तालुक्यातील वरपगाव येथील शेतकरी रावण बाबुराव रिटरकर हे आपल्या कुटुंबासह स्वतःच्या शेतात राहत. रविवारी नातेवाईकांच्या लग्नासाठी ते आपल्या कुटुंबासह बाहेर गेले होते. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन रिटरकर यांनी शेतात ठेवलेले दहा सोयाबीनचे कट्टे अज्ञात चोरट्याने चोरून नेले. यामुळे त्यांचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रावण रिटरकर आणि त्यांचे कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना सोयाबीन चोरीला गेल्याचे लक्षात आले. चोरीच्या घटनेने रावण रिटरकर यांना जबर धक्का बसला आणि त्यांनी त्या दिवशीपासून अन्न त्यागले. अखेरीस बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू आला. दुपारी त्यांच्या पार्थिवावर वरपगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रावण रिटरकर यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या