इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *परळीत ६ मे रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभेचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा!* *_नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा_*

*परळीत ६ मे रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभेचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा!*


*_नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा_*


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-

   ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने यावर्षी सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा येत्या ६ मे रोजी होणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात नियोजनबध्द सोहळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात आपल्या मुलांचा उपनयनसंस्कार करण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने करण्यात आले आहे.

Click:*'त्या' विवाहितेच्या आत्महत्येला कारणीभूत लोकांविरुद्ध परळीत गुन्हा; आरोपींवर कारवाईची भावाची आर्त मागणी*  

         गेल्या ४२ वर्षापासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आद्य शंकराचार्य जयंती शुक्रवार दिनांक ६ मे २०२२ रोजी वैद्यनाथ मंदिर दर्शन मंडप परळी वै. येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी ५०१ रु.नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे.या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात आपल्या उपनीत मुलांची नावनोंदणी करण्यासाठी बंडू महाराज टिंबे (दक्षिणमुखी गणेश मंदिर परळी वै.)मो.क्र.८९७५२९२१११, सचिन जोशी (जोशी मेडिकल मोंढा परळी वै.) मो.क्र.९९२२२६१७४०, गिरीश प्रयाग (प्रयाग इलेक्ट्रिकल I D B I बँकेसमोर) ९०२८८१११७२,चारुदत्त करमाळकर  मो. क्र. ९०२८०३४३८४,जयराम गोंडे (स्माईल फोटो स्टुडीओ) मो.क्र.९८२३१३७२९५, प्रमोद औटी, राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक मो.क्र. ९०२८८१११७३, हेमंत लोंढे (सिरसाळा)मो.क्र.९४२३७५७२१५, प्रदीप कुलकर्णी (घाटनांदूर) मो.क्र.९४२२२४०७६१, शैलेश कुलकर्णी (अंबाजोगाई) मो.क्र. ९४२२३३०३३७, प्रशांत गुरु जोशी (धर्मापुरी) ७२७६३४३७१२, कृष्णा गुरु जोशी (नागापूर) मो.क्र.९६८९८५११६१,यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा, स्वा.वी.दा. सावरकर प्रबोधिनी, पेशवा युवा संघटन,ब्राह्मण महिला आघाडी,ब्राह्मण युवक संघटना आदींनी केले आहे.

Click: परळी शिवारात विहिरीत आढळला मृतदेह*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या