इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-एकनाथ शिंदे बंडावर शिवसेना अॅक्शन मोडवर: आता आवाहन नाही तर आव्हान: पुरी तय्यारी है, अब हमारा चैलेंज है !

 एकनाथ शिंदे बंडावर शिवसेना अॅक्शन मोडवर: आता 'आवाहन' नाही तर 'आव्हान': पुरी तय्यारी है, अब हमारा चैलेंज है !




एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाविरोधात केलेल्या बंडाचा आज चौथा दिवस आहे.गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबई, सूरत, गुवाहाटी येथे वेगाने घटना घडत आहेत.शिवसेना आणि काही अपक्ष असे 46 आमदार आपल्याबरोबर असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे, तर दुसरीकडे सरकारने या आमदारांविरोधात काही कारवाई करता येते का, याचा विचार सुरू केला आहे.

Video news पहा:🛑 *'गण गण गणात बोते' चा जयघोष अन् परळीकर भाविकांचा हर्षोल्लास.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

'हम हार माननेवाले नही है, हम जितेंगे, फ्लोऱ ऑफ द हाऊस पे जितेंगे, जिसको हमारा सामना करना है वो मुंबई आ सकते है., अब टाइम निकल चुका है, उन्होने गलत कदम उठाया है. पुरी तय्यारी है, अब हमारा चैलेंज है', अशा भाषेत संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिलं आहे. सकाळी शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी या भाषेत बंडखोरांना मुंबईत येण्याचं आव्हानं दिलं.


         बहुमताचा आकडा एकनाथ शिंदे यांनी आपल्याबाजूने आहे असे म्हटले आहे, यावर तुमचे मत काय आहे असे पत्रकारांनी संजय राऊत यांना आज शुक्रवारी सकाळी विचारले. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "ही कायदेशीर लढाई आहे, काही नियम आहेत, काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. पाहू काय होतं ते. त्यांनी एक निर्णय घेतलाय. बहुमत हा फक्त चर्चेला. ते मुंबईत येतील तेव्हा बाळासाहेबांवरील भक्तीची शिवसेनेवरील श्रद्धेची कसोटी लागेल. महाविकास आघाडीच्या बाजूनेच आमदारंचा कौल असेल." आता महाराष्ट्रातील जनतेला मात्र यापुढे नक्की काय होणार, हे सरकार टिकणार की जाणार, गेले तर नवे सरकार कोणाचे असेल असे प्रश्न पडले आहेत.

-------------+++---+++++++++++----------

VideoNews पहा:● *दिंड्या परळी वैजनाथ पंचक्रोशीत दाखल.*


क्लिक करा व वाचा: कोरोनाच्या व्यत्ययी दोन वर्षानंतर आषाढी वारीच्या दिंड्या परळीत दाखल ; भाविकांत भावभक्तीचा उत्साह*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!