युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळीच्या मध्यवर्ती राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील पानटपरी फोडली

 परळीच्या मध्यवर्ती राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील पानटपरी फोडली 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

   परळी शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या राणी लक्ष्मीबाई टावर चौकातील एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी फोडली आणि पानपट्टीतील सुमारे 22 हजार 700 रुपयांचा माल लंपास केला आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

     अर्जदार ज्ञानेश्वर उर्फ मोहन महादेवअप्पा राजमाने रा. गंगासागर नगर, परळी वैजनाथ ता. परळी वैजनाथ यांची राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे शिवशक्ती पानसेंटर नावाने पानतट्टी आहे.या व्यवसायावर त्यांच्या कुटूंबाची उपजिवीका आहे.दिनांक 17.07.2022 रोजी रात्री पट्टी बंद करून ते घरी गेले. दुस-या दिवशी दि. 18.07. 2022 रोजी ते दुकान आले असता, पानपट्टीडब्बा बाजूने असलेल्या दरवाजाचे दोन लॉक तोडून आत प्रवेश करून आतील गल्ल्यामध्ये असेलेले रोख रक्कम रू-2980 व इतर विक्रीचा माल असा मिळून एकुण रू 22700 रुपये ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही अधिक तपास पोलीस करत आहेत.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या