इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-*परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा खडका बंधारा तुडूंब!* _नऊ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा_

   परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा खडका बंधारा तुडूंब!



_नऊ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा_


परळी वैजनाथ, एमबी न्युज वृतसेवा......

    परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा  खडका बंधारा १०० टक्के भरला असुन तुडुंबभरून ओसंडून वाहत आहे. जायकवाडीचे पाणीसोडण्यात आल्याने. या बंधाऱ्याचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा बंधारा पुर्ण ओसंडून वाहत असल्याने परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राला लागणार्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.अखंडीत वीजनिर्मिती करण्याच्या दृष्टीने ही अतिशय समाधानाची बाब आहे.


       गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसाने तसेच जायकवाडीचे पाणी सोडण्यात आल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करीत असलेला सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारा ओसंडूनवाहतआहे. बुुधवारी(दि.28) 13 पैकी 9 दरवाजे रात्री  उघडून पाणी सोडण्यात आले.  नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा बंधारा भरल्याने या बंधार्याखालील गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला याच ठिकाणाहून  पाणी पुरवठा होतो  त्यामुळे परळी वीज केंद्रासह सोनपेठ तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या