MB NEWS- प्रकाश चव्हाण यांचे चिंतन >>>>पोहरागड येथील महंताच्या भुमीकेमुळे बंजारा समाजाचे होणार राजकीय नुकसान
पोहरागड येथील महंताच्या भुमीकेमुळे बंजारा समाजाचे होणार राजकीय नुकसान
- ✍️ प्रकाश चव्हाण
------------------------------------
● पोहरागडाच्या मंहतानी घेतलेली भुमीका निश्चीतच व्यक्ती हिताची असु शकते समाजहिताची नक्कीच नाही. मी ही सर्व भुमीका पेहरागड येथील राष्ट्रीय संत सेवालाल महाराज यांच्या गादीचा व पोहरागडा मान राखुन लिहीली आहे.
---------------------------
राज्यात नुकतेच सत्तांतर झाले आहे. या सत्तांतरात चार वेळेस दिग्रस विधानसभा मतदार संघातुन निवडुण आलेले ना. संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाले आहे. अडीच वर्षापुर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास अघाडी सरकारमध्ये मंत्री झाले होते. परंतु एका प्रकरणात नाव आल्याने भाजपनी राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन केल्याने ना संजय राठोड यांना राजीनामा दयावा लागला होता. परंतु मागील महिन्यात भाजप सोबत सत्तेत आल्याने मंत्रीपद मिळाले आहे. ज्यांच्या आरोपामुळे राजीनामा दयावा लागला त्यांच्या सोबत मंत्रीपदाची शपथ घेण्याची संधी राठोड यांनी मिळाली आहे. याच संधीचा तेव्हाचे सत्ताधारी आत्ताचे विरोधक झाल्याने ना संजय राठोड यांच्यावर आरोप करीत आहेत. या सर्व गोष्टी राजकारणात स्वाभावीकपणे घडत असतात.
ना. संजय राठोड यांच्यावर आरोप म्हणजे बंजारा समाजावर आरोप असल्याचे समाजातील त्यांच्या समर्थकांना म्हणने असल्याने त्यांना रूचले नाही. त्यात काही गैर असु शकत नाही. जिवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते सर्वच पुढाऱ्यांकडे झालेत. तसेच राठोड यांच्याकडे असतील. परंतु देशभरातील कोटयावधी बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या पोहरागड येथील महंतानी या प्रकरणात उडी घेत उघडपणे ना. संजय राठोड यांची बाजु घेतली. पत्रकार परिषद घेत मंत्री राठोड यांच्यावर आरोप कराल तर बंजारा समाज आरोप करणारांना निवडणुकीत जागा दाखवेल अशी जाहीर धमकी दिली. श्रध्दास्थान असलेल्या पोहरागडावर संकट आल्यागत तेथील महंतानी (महाराजांनी) धमकी दिली.
पोहरागडाचे शिष्य असलेला बंजारा समाज जणु ना. राठोड यांच्यामागे असल्याचे महंतानी जाहीर करूण टाकले. अशी भुमीका घेताना महंतानी समाजाशी विचार विनिमय केला आहे का? यापुढे राज्यातील सर्व बंजारा समाज ना. संजय राठोड यांच्यामागे रहाणार आहे का? पोहरागडाच्या मंहतांच्या आदेशामुळे राहीला तर येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बंजारा बहुल असलेल्या काही मतदार संघातुन बंजारा समाच्या उमेद्वाराला उमेद्वारी मिळउन देउन निवडुण आणन्याची ताकद ना. राठोड यांच्यात आहे का? असेल तर चांगली गोष्ट आहे. नसेल तर ईतर पक्षातील बंजारा समाजातील नेत्यांना महंताच्या भुमीकेचा फायदा होईल की तोटा होईल. याचा विचार झालेला दिसत नाही. मंहतानी घेतलेल्या भुमीकेचा ईतर पक्षातील नेत्यांना नक्कीच फटका बसणार आहे. याचाच अर्थ बंजारा समाजाचे नुकसान होणार आहे.
सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाचा फायदा बघुन कुठल्याही समाजातील नेत्यास उमेद्वारी देत असतात. वसंतराव नाईक हे तब्बल बारा वर्ष व सुधाकरराव नाईक हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. सुधाकरराव नाईक यांना अडीच वर्षातच मुख्यमंत्री पदावरूण पायउतार व्हावे लागले होते. तेव्हा काही मंहतानी त्यांच्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे ऐकीवात नाही. यावेळेसच असे काय झाले की महंतांनी जाहीर भुमीका घेतली. पोहरागडाच्या मंहतानी घेतलेली भुमीका निश्चीतच व्यक्ती हिताची असु शकते समाजहिताची नक्कीच नाही. मी ही सर्व भुमीका पेहरागड येथील राष्ट्रीय संत सेवालाल महाराज यांच्या गादीचा व पोहरागडा मान राखुन लिहीली आहे. यामुळे बंजारा समाजाचे पुढील काही काळासाठी राजकीय नुकसान होणार हे मात्र नक्की.
![]() |
✍️प्रकाश चव्हाण
मु. वडखेल पो.पांगरी ता.परळी वै. जि.बीड मो. नंबर ९४२२७४२३४८
---------------------------------------------
●हे देखील वाचा/पहा
Click: *घरफोडी:दीड लाखाची रोख रक्कम चोरली*
Click: *सावधान: ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा*
Click:*भाजप संसदीय मंडळातून नितीन गडकरी बाहेर तर केंद्रीय निवडणूक प्रचार समितीत देवेंद्र फडणवीस*
Click:*राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग*
Click:*श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार*
Click:*परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन*
■ VIDEO News ■
--------------------------------------------
Click: ■ *LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी*
Click :■ *१५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर करायचे काय ?*
■ VIDEO News ■
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा