इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:परळीतील चोऱ्या सुरुच: 1 लाख 43 हजार रुपयांची घरफोडी

 परळीतील चोऱ्या सुरुच: 1 लाख 43 हजार रुपयांची घरफोडी




         घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचा ऐवज व नगदी लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना शहरातील शिवाजी नगर भागात घडली असून या प्रकरणी संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातील थर्मल रोड शिवाजी नगर भागातील रहिवासी असलेले अमरलाल पुरणलाल परदेशी यांनी संभाजी नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरामध्ये कोणीतरी अज्ञात चोरटयाने दरवाजाचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून 21 हजार रुपयांची सोन्याचे दागीने व 1 लाख 22 हजार नगदी रोख रक्कम असा एकूण 1 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज चोरून घेवुन गेले आहे.

     
या प्रकरणी परदेशी यांच्या फिर्यादीवरून संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुरन २४७ / २०२२ कलम  ४५४,४५७,३८० भादवी नुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाण्याचे सपोनि गित्ते हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या