इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-देशात पुन्हा मास्क सक्ती-केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे संकेत

 देशात पुन्हा मास्क सक्ती-केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे संकेत




नवी दिल्ली : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चीनमध्ये कोरोनाचा स्फोट पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतातही विशेष काळजी घेतली जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.


चीनच्या परिस्थितीवरून भारतात आधीच खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कालच मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज कोरोना संदर्भात निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. चीनमधील कोरोनाचा उद्रेक पाहता भारताची पुढची पावले काय असतील, त्याची रूपरेषा काय असेल यासंदर्भात आज बैठकीत निर्णय घेण्यात आला असून, सर्वप्रथम विमानतळावर आलेल्या प्रवाशांची चाचणी घेण्याचे ठरले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या