MB NEWS-बुध्द जयंतीनिमित्त१६ मे रोजी परळीत भव्य मिरवणूक

 बुध्द जयंतीनिमित्त१६ मे रोजी परळीत भव्य मिरवणूक



परळी(प्रतिनिधी)÷ तथागत भगवान गौतम यांची2566वी जयंती परळी शहरात मोठ्या उत्साहाने दि.16/5/2022साजरी करण्यात येणार असून,त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दि16मे 2022रोजी,सांय.5:00वाजता भिमनगर,येथून बुध्द प्रतिमेची भव्य मिरवणुक निघणार असल्याची माहिती बुध्द वंदना संघाने दिली आहे.

     बुध्द वंदना संघाच्या वतीने यावर्षी बुध्द जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.सकाळी9:00वाजता धम्मध्वजारोहन होणार असून,9:30वाजता "खिरदान" तर सांय.5:00वाजता भिमनगर येथुन भव्य अशी मिरवणूक निघणार असून सदरील मिरवणुक भिमनगर,गणेशपार,मिलिंद काॅलेज,टाॅवर चौक,मोंढा,मार्गे रेल्वे स्टेशन येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर पूतळा येथे रार्त्रो 8:00वाजता विसर्जन होणार आहे,तरी परळी शहर व परिसरातील बौध्द उपासक व उपासिकांनी या मिरवणूकीत शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी व्हावे असे आवाहन,बुध्द वंदना संघाने केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार