परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-अभिजीत देशमुखांचा लाईव्ह संवाद :परळीत चर्चा अन् राजकीय अन्वयार्थ

 अभिजीत देशमुखांचा लाईव्ह संवाद :परळीत चर्चा अन् राजकीय अन्वयार्थ



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     परळीतील मातब्बर राजकीय वारसा लाभलेले व मनातुन लोकांच्या  पसंतीस उतरेल असे युवकांमधील एक नाव म्हणजे अभिजीत देशमुख. सार्वजनिक क्षेत्रात गेल्या काही काळात काहिसे अलिप्त राहिलेले अभिजीत देशमुख यांनी  आपण युवक, शेतकरी यांच्याशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधणार असल्याचे सामाजिक माध्यमांमधून एक पोस्ट प्रसारित केली. आज फेसबुक लाईव्ह संवाद साधला. हे लाईव्ह व त्यामागचे तर्क वितर्क परळीत लक्षवेधी ठरले. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चा आणि अन्वयार्थ लावल्या जावू लागले. बहुतांश राजकीय अन्वयार्थाने याचा विचार अनेकांच्या मनात सुरू झाला.

     अभिजीत देशमुख यांनी आज दि.१४ रोजी दुपारी  लाईव्ह येउन संवाद साधला. याबाबतची माहिती त्यांनी अगोदरच सामाजिक माध्यमांमधून एक पोस्ट करुन दिली होती. युवकांचे मोठे संघटन त्यांनी बांधलेले आहे. हजारो युवकात त्यांचे फाॅलोवर्स आहेत.परळीत त्यांच्या नावाला मोठं वलय आहे. मधल्या काळात ते सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सक्रिय राहिले. युवकांचे संघटन व विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते कार्यरत राहिले. महाराष्ट्र शेतकरी शुगर्स लि.ची स्थापना केली.अशा विविध माध्यमातून कामात राहिल्यामुळे युवक, शेतकरी, सामाजिक प्रश्न, उद्योग आदी समस्यांवर त्यांचा चांगला अभ्यास आहे. याबाबतच खरं तर ते आपल्या  लाईव्हवर मुक्त संवाद साधत मनातलं बोलले. त्यात समाजकारण, राजकारण, राजकीय नेते,जातिय सलोखा आदींबाबत त्यांनी आपले विचार मांडले.'मी बोलणार' असे अभियान राबवण्याचा मनोदय व्यक्त केला.त्याचप्रमाणे राजकारणात निश्चित योग्य वेळी सक्रिय होऊ व जनसेवेसाठी योग्य संधी मिळाली तर सोनं करून दाखवू असा ठाम निर्धार व्यक्त केला.

Click & watch -🔸 *लक्षवेधी:परळीचे अभिजीत देशमुख राजकारणात "कम बॅक" करतायत का?* • *पहा: लाईव्ह संवादातून काय मांडली भूमिका.* युट्युब वर MB NEWS ला नक्की Subscribe करा._

      एकंदरीत आजच्या त्यांच्या संवादातून अनेक मर्म त्यांनी बोलून दाखवले यावरुन त्यांच्या भावी राजकीय भूमिकेची चर्चा सुरू झाली. आता निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर अभिजीत देशमुख पुन्हा नव्याने सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय होत असल्याचा अर्थ काढला जात आहे.गेल्या काही काळात काहिसे अलिप्त राहिलेले अभिजीत देशमुख या माध्यमातून सक्रिय होत असल्याचा अन्वयार्थ व चर्चा होणे वावगे नाही. खरोखरच ते सक्रिय होणार का? परळीतील राजकीय -सामाजीक क्षेत्रात ते 'कम बॅक ' करत आहेत का? अशा वेगवेगळ्या अन्वयार्थाला येणाऱ्या काळातील वाटचाल व त्यांच्या अगामी भुमिकाच स्पष्टता आणून देतील असे दिसते.


हे देखील वाचा/पहा🔸

🟥 *धडाका:आयपीएस पंकज कुमावत यांनी उस्मानाबाद शहरात टाकल्या अकरा ठिकाणी धाडी*

*खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !*

🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!*

🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठार*_

🛑 *पंकजाताई मुंडेंचा मतदारसंघात सर्वस्पर्शी दौरा* 🔸 *जनतेचं प्रेम अन् विश्वास तसुभरही कमी नाही ; सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोगही प्रभावी!*


*40 हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरिक्षक चतुःर्भूज*



जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis


🔸 MB NEWS/माझी बातमी🔸




      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!