परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-महाराष्ट्र अंनिसच्या जनप्रबोधन यात्रेची सुरुवात

 समाजातील विखारी विचार संपविण्यासाठी संतांचे विचार जनमानसात रुजविणे गरजेचे —ह.भ प.शामसुंदर सोन्नर महाराज




 महाराष्ट्र अंनिसच्या जनप्रबोधन यात्रेची सुरुवात     

   अकोला (प्रतिनिधी) :   समाजातील अनिष्ट रूढी परंपरा व अंधश्रद्धांची घाण स्वच्छ करण्याचे  व विवेकी विचार रुजविण्याचे कार्य  संतांनी केले. तसेच समाजात समता आणि बंधुत्वाची मूल्य संत साहित्यात जागोजागी आढळतात. म्हणूनच समाजातील वाढता विखारी विचार कमी करायचा असेल तर संतांचा समतावादी विचार समाजात रुजविणे गरजेचे आहे. हाच विचार वारसा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे चालवत आहे, असे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज  सोन्नर मुंबई  यांनी गाडगे बाबा जन्मभूमी स्थळी शेंडगाव येथे केले.

Click & watch -🔸 *लक्षवेधी:परळीचे अभिजीत देशमुख राजकारणात "कम बॅक" करतायत का?* • *पहा: लाईव्ह संवादातून काय मांडली भूमिका.* युट्युब वर MB NEWS ला नक्की Subscribe करा._

     महाराष्ट्र अंनिसच्या वतीने १४ ते २३ मे २०२२ या कालावधीत आयोजित शेंडगाव ते पंढरपूर या वारसा संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा जनप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी शामसुंदर महाराज बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, समाजात सध्या विषमतावादी विचारांचा विखार वाढतो आहे. माणसा माणसात जात-धर्माच्या नावाखाली फूट पाडली जात आहे. अशा वेळी 

*कोणाही जीवाचा न घडो मत्सर*

यासारख्या बंधुत्वाची पेरणी करणा-या विचारांची रुजवात समाजात झाली तर विषमतेचा विखार कमी होईल, असा अशावादही शामसुंदर महाराज यांनी व्यक्त केला.



संत गाडगे बाबा यांचे जन्मस्थान शेंडगाव येथे आयोजित उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र अनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे, राज्य ऊपाध्यक्ष महादेवराव भुईभार, शेंडगाव चे सरपंच गजानन सोळंके, उपसरपंच स्वप्नील साबळे, राज्य सरचिटणीस  प्रा.बबनराव कानकिरड, जिल्हा कार्याध्यक्ष डाॅ.संजय तिडके, अभियान प्रमुख राज्य सहकार्यवाह मनोहर जायभाये, हनुमंत मुंडे, दर्यापुरचे विनोद चोंडके, सुभाष वडुरकर गाडगे बाबाचे पणतू नितीन जानोरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. राष्ट्रसंत गाडगे बाबाचे जन्मस्थानी मान्यवरांचे हस्ते वृक्ष रोपट्यास  पाणी घालून या जनप्रबोधन यात्रेची सुरुवात करण्यात आली.



    राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी प्रास्ताविकात महा. अंनिस ही देव धर्माच्या विरोधात असल्याचा गैरसमज लोकात धर्मांध शक्तीनी केला आहे. वास्तविक देव आणि धर्माच्या संदर्भात समितीची भूमिका तटस्थतेची आहे. महा. अंनिसच्या पंचसूत्रीत संत आणि समाज सुधारकांचा विवेकी विचाराचा कृतिशील वारसा पुढे नेत आहे. त्यातून खरा देव आणि खरा मानवतावादी धर्म कोणता हे संत वाचनातून सांगण्याचा प्रयत्न करते. शेंडगाव ते पंढरपूर जनप्रबोधन यात्रेच्या आयोजनामागील भुमिका सविस्तर मांडली. तर महादेवराव भुईभार यांनी संत गाडगे बाबाच्या वेशभुषेत गाडगे बाबांचे कीर्तन सादर केले. सरपंच गजानन सोळंके यांनी महा अंनिस च्या या उपक्रमाचे व टीम चे स्वागत करून  ऊपक्रमास हार्दिक सदिच्छा देऊन गाडगे बाबा जन्मभुमी विकासास व त्यांचे विचार समाजमनात रुजविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. आकोला जिल्हा महा. अंनिस कार्याध्यक्ष डाॅ.संजय तिडके यांनी सूत्रसंचालन तर विनोद चोंडके यांनी आभार मानले. ही जनप्रबोधन यात्रा पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी मोझरी येथे जाणार असुन पुढे मुक्ताईनगर मार्गाने पंढरपूर येथे 23 मे रोजी पोहचणार आहे.  

या कार्यक्रमास  गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान  अकोलाचे  अध्यक्ष रोहन बुंदेले, वैष्णवी आसेकर, राजश्री ईंगळे,  प्रा प्रविण काळे,  प्रदीप पाटील साबळे यांचेसह गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!