परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-खळबळजनक:शेजारच्या मुलाकडून सतत छेड; त्रासाला कंटाळून १७ वर्षिय विद्यार्थिनीने घेतला गळफास

 खळबळजनक:शेजारच्या मुलाकडून सतत छेड; त्रासाला कंटाळून १७ वर्षिय विद्यार्थिनीने घेतला गळफास



अंबाजोगाई, प्रतिनिधी....

       गावातीलच एका रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून एका १७ वर्षिय मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटनाअंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे घडली.याप्रकरणी 'त्या' रोडरोमिओ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने खळबळ उडाली आहे.आरोपी अटक करण्यात अद्याप पोलीसांना यश आले नसुन गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 


         बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १०) अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे घडली होती. गावातीलच एका रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यानंतर  गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दिपाली रमेश लव्हारे (वय १७, रा. पट्टीवडगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. दिपालीचे वडील राज्य परिवहन मंडळात चालक असून सध्या पालघर येथे कार्यरत आहेत. दिपालीची आई  यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख हा तरुण मागील काही दिवसापासून दिपाली कॉम्प्युटर क्लासला जात येत असताना तिला छेडत होता. रस्त्यात अडवून वेडेवाकडे बोलणे, सतत इशारे करणे अशा पद्धतीने तो तिला त्रास देत होता. याबाबत दिपालीने आईला सांगितले होते. शुक्रवारी (०६ मे) दिपालीच्या वडिलांनी अकबरला बोलावून घेऊन तिला त्रास न देण्याबद्दल बजावले होते. परंतु त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. त्याचे त्रास देणे सुरु असल्याचे दिपालीने आईला सांगितले होते. त्यावर वडील आणि भाऊ आला की आपण मार्ग काढूत अशी आईने तिची समजूत घातली. 

           अखेर सततच्या त्रासाला कंटाळल्याने तीने  मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आई गावातील जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेली असल्याने घरात कोणी नसताना घराच्या माळवदाच्या आडुला साडीने गळफास घेतला. रात्री ११ वाजताच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांच्या मदतीने तिला दिपालीला स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले असे फिर्यादीत नमूद आहे. या फिर्यादीवरून अकबर बबन शेख याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही. पुढील तपास बर्दापूर पोलीस करत आहेत.

हे देखील वाचा/पहा🔸

*खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !*


🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!*


🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठार*_


🛑 *परळीत माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव ; लक्षवेधी शोभायात्रा.*


🛑 *पंकजाताई मुंडेंचा मतदारसंघात सर्वस्पर्शी दौरा* 🔸 *जनतेचं प्रेम अन् विश्वास तसुभरही कमी नाही ; सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोगही प्रभावी!*


*40 हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरिक्षक चतुःर्भूज*


*दुर्दैवी: ऊसाला आग लाऊन शेतकऱ्यांची गळफास घेवुन आत्महत्या*


• _परिचारिका दिन विशेष_• *परळी तालुक्याचा भूमिपुत्र बजावतोय गेल्या आठ वर्षापासून पुणे येथे परिचारिका म्हणून कर्तव्य*


🔸 _*मौंजीबंधना नंतर बटूच्या पाया पडण्याची रीत आहे.काय आहे यामागची धार्मिक कारण मीमांसा?.....*_


*ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येस शासन-प्रशासन जवाबदार - कॉ अजय बुरांडे*


🛑 *गुरुचरणी संपूर्ण समर्पण करण्याचा संस्कार म्हणजे व्रतबंध -प्रज्ञाचक्षु विद्याभुषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज*


*MPSC:राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर*


*प्रज्ञाचक्षु विद्याभूषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांनी घेतले प्रभु वैद्यनाथ दर्शन*

----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis


🔸 MB NEWS/माझी बातमी🔸




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!