इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:शेततळ्यामध्ये बुडून तीन बालकांचा मृत्यू

 शेततळ्यामध्ये बुडून तीन बालकांचा मृत्यू



केज - तालुक्यातील पैठण सावळेश्वर येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून तीन बालकांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे.

केज पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पैठण सावळेश्वर येथे असलेल्या शेतामध्ये शेततळ्यात मंगळवारी (दि. २१) दुपारी बुडून स्वराज जयराम चौधरी, पार्थ श्रीराम चौधरी आणि श्लोक गणेश चौधरी या तीन 5 ते 8 वर्षीय बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. सदरील घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. मात्र सदरील घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.



दरम्यान, सदर घटनेची माहिती युसुफ वडगाव चे एपीआयश्री खाले त अन्य पोलिस कर्मचायांनी घेतली असुन घटनास्थळी पोहचले आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या