इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:फुले -शाहू - आंबेडकरी चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी साहित्यिक-पत्रकारांनी पुढाकार घ्यावा:- धनंजय आरबुने

 फुले -शाहू - आंबेडकरी चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी साहित्यिक-पत्रकारांनी पुढाकार घ्यावा:- धनंजय आरबुने




परळ, प्रतिनिधी


फुले -शाहू -आंबेडकरी चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी साहित्यिक- पत्रकारांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार धनंजय आरबुने यांनी केले. ते लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे शहराध्यक्ष जगदीश शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरंडे ,व्हाईस ऑफ मीडियाचे पत्रकार श्रीराम लांडगे, डिजिटल मीडिया तालुका सचिव दिपक गित्ते, पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्षअमोल सूर्यवंशी, धीरज जंगले, प्रा.दशरथ रोडे आदींची उपस्थिती होती. 

या प्रसंगी धनंजय आरबुने पुढे म्हणाले की, महाराष्ट्रभूमी ही फुले -शाहू -आंबेडकर आणि पुरोगामी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.लोकराजा छत्रपती  राजर्षी शाहू महाराजांनी लोक कल्याणकारी निर्णय घेऊन विषमतावादी व्यवस्थेस आव्हान दिले . त्यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना शिक्षणासाठी वसतिगृह काढले, बालविवाह सतीप्रथा बंद केल्या तसेच त्यांच्या राज्यात जलनीतीवर प्रभावी अंमलबजावणी केली. अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले त्यांनी आपल्या जीवन काळात घेतले. स्मृती अभिवादनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यांनी  तर आभार नितीन ढाकणे यांनी मानले.या प्रसंगी पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या