इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:पंकजा मुंडेंचा एक फोन अन्.....

 हरिद्वार यात्रेला निघालेल्या बीड जिल्ह्यातील भाविकांना मध्यप्रदेश बाॅर्डवर आडवून लटकत ठेवले ; पंकजा मुंडेंचा एक फोन अन्.....




पंकजाताई मुंडेंचा एक फोन अन् नेकनूरच्या भाविकांचा पुढील प्रवास झाला सुकर !


बीड जिल्हयातील भाविकांना मध्यप्रदेशातही दिसला नेतृत्वाचा करिश्मा



भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाचा करिश्मा बीड जिल्हयातील भाविकांना काल अनुभवास आला, त्यांच्या एका फोनमुळे नेकनूर येथील भाविकांचा हरिद्वारचा प्रवास सुकर होऊ शकला.


   त्याचं असं झालं, नेकनूर येथील ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे हे एक हजार भाविकांसमवेत हरिद्वार ला जाण्यासाठी प्रवास करत होते, त्यांच्यासोबत अन्न धान्याची ट्रक, स्वयंपाकी व कांही सेवेकरी देखील होते. महाराष्ट्रातून मध्यप्रदेशच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर सैंधवा बॉर्डर वर त्यांची धान्याची ट्रक व सोबतच्या माणसांना पोलिसांनी अडवले व काही तरी कारण देऊन दुपारपासून ताटकळत ठेवले. ट्रकची पासिंग व सर्व आवश्यक कागदपत्रं त्यांनी पोलीसांना दाखवली पण ते त्यांना सोडण्यास काही तयार नव्हते. शेवटी मेंगडे महाराजांनी सायंकाळी पंकजाताई मुंडे यांच्याशी संपर्क करून सर्व हकीकत सांगितली. पंकजाताईंनी लगेचच मध्यप्रदेशातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलून पोलिसांना संपर्क साधला आणि मग विनाकारण अडवलेली गाडी पोलिसांनी अखेर सोडली, त्यानंतर भाविक पुढील प्रवासाच्या दिशेने रवाना झाले. या सर्व प्रकारात भाविकांसाठी वेळीच धावून आलेल्या पंकजाताईंचे आभार व्यक्त करण्यास मात्र मेंगडे महाराज विसरले नाहीत. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!