प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 निरोगी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे योग -मुख्याध्यापक लिंबाजी दहिफळे 



परळी वैजनाथ/प्रतिनिधी 

आयुष्यभर निरोगी, निरामय आयुष्य जगण्यासाठी नियमित योगाभ्यास करणे ही काळाची गरज बनली असून आपल्या भारतीय योग संस्कृतीचा सर्व जगाने स्वीकार केला असून योगाच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगता येते असे प्रतिपादन भगवान प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक लिंबाजी दहिफळे यांनी काल भगवान विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करते वेळी प्रतिपादन केले.

 शालेय स्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक अनंत मुंडे व सुनील चव्हाण यांनी मुलांना योग विषयक माहिती सांगून प्रात्यक्षिके सादर केली, शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

 यावेळी शाळेतील शिक्षक दत्तात्रय तिडके, अशोक वेडे ,सिंधू सोनवणे, संगमित्रा वाघमारे, अंजली कुलकर्णी, महेंद्र वाघमारे, सचिन अंबाड ,सचिन गवळी, राजेश विभुते यांनीही आपला सक्रिय सहभाग नोंदवला. आभार गोविंद मुंडे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या