इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या नोंदीसाठी मागितले दोन हजार रुपये:तहसीलचा लिपिक लाच लुचपत पथकाच्या जाळ्यात

 लिंगायत समाज स्मशानभूमीच्या नोंदीसाठी मागितले दोन हजार रुपये:तहसीलचा लिपिक लाच लुचपत पथकाच्या जाळ्यात 




धारूर, 

 येथील तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असणारे महेश कोकरे यांनी तालुक्यातील आसरडोह येथील स्मशानभूमीच्या नोंदीसाठी २ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. सदरील तक्रार केल्यानंतर महेश कोकरे यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

तालुक्यातील आसरडोह येथील एका स्मशानभूमीची नोंद करण्यासाठी तेथील अरुण तोडकर वय वर्ष 57 यांना तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या महेश कोकरे या कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपयाची लाच मागितली होती तसेच खूप दिवसापासून अरेरावी भाषा वापरून अपमानित करत होता शेवटी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे सदरील व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी साडेचार वाजता सापळा रचून महेश कोकरे यास रंगेहात पकडले. तरी पुढील गुन्हा नोंद करण्याची कारवाई पोलीस करत आहेत .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या