अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार!

​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव

​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :

       जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.

    ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोटाला चिमटा काढून आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवल्या.

​डॉ. विजय गिरी यांचे प्राथमिक शिक्षण (इ. १ ली ते ४ थी) जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळगाव गाढे येथे झाले. माध्यमिक शिक्षण (५ वी ते १० वी) श्री महेश विद्यालय शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण (११ वी व १२ वी) लातूर येथील नामांकित राजर्षी शाहू ज्युनिअर सायन्स कॉलेजमध्ये पूर्ण झाले. १२ वीनंतर 'नीट' (NEET) परीक्षेत उत्तम गुण मिळवून त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध 'टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज'मध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळवला. नुकत्याच जाहीर झालेल्या अंतिम निकालात विजय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन 'डॉक्टर' झाला आहे. एसटी चालकाच्या मुलाने मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे गाढे पिंपळगावचे नाव वैद्यकीय क्षेत्रात रोशन झाले आहे. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी गावातील युवक आणि वर्गमित्रांच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात मुख्य सत्कार सोहळा पार पडला. ​याप्रसंगी गावचे युवा सरपंच अमोल घुंबरे, माजी समाजकल्याण सभापती प्रभाकर वाघमोडे, माजी सरपंच तथा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन शरद राडकर, आणि चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते डॉ. विजय गिरी व त्यांच्या आई-वडिलांना मानाचा फेटा, शाल आणि श्रीफळ देऊन भावुक वातावरणात नागरी सत्कार करण्यात आला. या कौतुक सोहळ्यासाठी सेवानिवृत्त मुख्य अभियंता माणिकराव वाघमोडे, माजी कृषी अधिकारी डॉ गुरुनाथ थोंटेसह गाढे पिंपळगाव व परिसरातील ग्रामस्थ, तरुण आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉ. विजयच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या