अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

इमेज
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! ​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण ​ एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.     ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...

कृषीमंत्री धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट

 कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी घेतलाय 'हा' निर्णय 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       राज्याच्या नवीन मंत्र्यांना आज खातेवाटप करण्यात आले यामध्ये धनंजय मुंडे यांना कृषिमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे कृषिमंत्री झालेल्या धनंजय मुंडे यांनी उद्या दिनांक 15 जुलै रोजी त्यांचा असणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे याबाबत त्यांनी आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले असून बळीराजा अडचणीत असताना वाढदिवस साजरा करणे संयुक्तिक ठरणार नसल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.


अशी आहे धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट 


 बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. आपला बळीराजा संकटाच्या छायेत असताना मी वाढदिवस साजरा करणे संयुक्तिक नाही.

 

तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा माझ्यासोबत कायमच आहेत. परंतू पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवत यावर्षीचा वाढदिवस मी साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो. 

आपला,

धनंजय मुंडे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या