युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

मानवी हदयात धैर्य पेरणार गुरूजी असतो - प्रा. डॉ . माधव रोडे

 मानवी हदयात धैर्य पेरणार गुरूजी असतो - प्रा. डॉ . माधव रोडे


सिरसाळा ( ता. परळी ) : -

येथे श्री पंडितगुरू पार्टीकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिक्षक दिन निमित्ताने प्रा . डॉ . माधव रोडे यांच्या व्याख्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . त्यावेळी कार्यक्रमाच्या विशेष उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष मा . श्री . व्यंकटराव कदम तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ के . के . पाटील होते , प्रा . डॉ . के . एम . नागरगोजे, प्रा . दयानंद झुंजुर्डे, प्रा . वाळके मॅडम उपस्थितीत होते . या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन  यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाली . यावेळी शिक्षक व विद्यार्थीना मार्गदर्शन करताना प्रा . डॉ . माधव रोडे म्हणाले, 

विद्यार्थी चांगल्या ज्ञानाशिवाय आपली शक्ती वापरू शकत नाहीत , म्हणुन युवकांनी ज्ञान मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करावे . त्यासाठी गुरूजी लागतात, मानवी हदयात धैर्य पेरणारी व्यक्ती खरी चिकित्सक असते . सकारात्मक प्रेरणे धैर्य भरलेला युवकाच जगबदलण्याची क्षमता असते . एकच ध्येय घेत तमाम मनुष्यजात जगत असते , ते ध्येय म्हणजे शोध सुखाचा .  यावेळी मला महात्मा फुले यांच्या हया ओळी आठवता  

सत्या सर्वांचे आदी | सर्व धर्मांचे माहेंर ॥

सत्य सुखाला आधार | बाकी सIरा अंधकार ॥

विद्यार्थी मित्रानों , विवंचनेच्या भोवऱ्यात अडकलेल्या माणसाला बाहेर पडण्यासाठी शिक्षक आवश्यक असतो, म्हणुन शिक्षकचा  सन्मान केला जातो . शिक्षक आपल्या शिष्यांना फक्त कागदी परीक्षेसाठीच नव्हे, तर जीवनातील प्रत्येक परीक्षेसाठी तयार करत असतो, शाळेच्या खिडकीबाहेरचे जग दाखवणारे आणि माणुसकीचे धडे गिरवायला, माणसे वाचायला, माणुसकी जपायला शिकवणारा खरा शिक्षक अस मी मानतो . एका लक्षात ठेवा अडथळा सिध्दीसाठीचे प्रोत्साहन असतो. प्रा . रोडे म्हणाले मला त्यापुढे जाऊन असे म्हणायचे आहे की,  विद्यार्थींचा उत्साह कमी न करता  आयुष्याबाबत त्याला निराश न करता त्याचे मार्गदर्शन करण्यात शिक्षक महत्वाची भुमिका पाडू शकतो, विद्यार्थींची शिकण्याची क्षमता शिकणे , त्यात आवड निर्माण करणे ही शिक्षकाची भुमिका असावी , समज विकसित क्रण्यासाठी गैरसमज कमी करायला हवेत याची जाणीव विद्यार्थीना करू देणे गरजेचे आहे असे प्रा . डॉ . माधव रोडे म्हणाले . 

कार्यक्रमाचे आयोजन एन . एस . एस . च्या कार्यक्रधिकारी प्रा . के .एम. . नागरगोजे यांनी करले . तर सुत्रसंचलन जयदिप सौंळके, आभार कार्यक्रमधिकारी प्रा . दयानंद झुंजुर्डे यांनी मांडले,  कार्यकमात  विद्यार्थी मोठ्या संख्याने सहभाग नोंदवला .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या