इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

अजितदादांचा तडकाफडकी राजीनामा

 अजितदादांचा तडकाफडकी राजीनामा



पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (10 ऑक्टोबर) अचानक पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) याची जबाबदारी तसेच वाढता व्याप लक्षात घेता हा राजीनामा दिल्याचं अजित पवारांनी बँकेच्या संचालक मंडळाला कळवलं आहे. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत माहिती दिली.
    मागील 32 वर्ष अजित पवार हे पुणे जिल्हा बँकेचं प्रतिनिधित्व करत होते. मात्र, याच बँकेशी संबंधित कर्ज आणि जरंडेश्वर साखर कारखाना याप्रकरणात अजित पवारांवर काही गंभीर करण्यात होते. मात्र, त्यानंतर काही महिन्यातच अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर त्यांच्यासंबंधी चौकशीचा विषय हा मागे पडला.

दरम्यान, आता अजित पवार यांनी अचानक संचालक पदाचा राजीनामा का दिला असावा याचे वेगवेगळे राजकीय अर्थही काढले जात आहेत. मात्र, नेमकं कारण तरी अद्याप समोर आलेलं नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....