MB NEWS:वै. बंकटस्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त हरिनाम सप्ताह भागवत कथा,विवाह सोहळ्याचे आयोजन

वै. बंकटस्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त हरिनाम  सप्ताह भागवत कथा,विवाह सोहळ्याचे आयोजन  

नेकनूर, वारकरी संप्रदायातील भक्ती सूर्य म्हणून ओळख असलेले वैकुंठवासी बंकटस्वामी महाराजांच्या 79 पुण्यतिथीनिमित्त आजपासून दि.29 एप्रिल ते सहा मे दरम्यान नेकनूर मध्ये हरिनाम सप्ताह होत आहे. रोज दुपारी समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून भागवत कथा ऐकायला मिळणार आहे.नामवंत कीर्तनकार याची कीर्तन सेवा आणि विवाह सोहळा असणार आहे.                             


      दिनांक 29 एप्रिल रोजी स्वामींची पालखी येथील शिक्षक कॉलनी परिसरातून भव्य दिव्य प्रमाणात सकाळी नऊ वाजता निघणार आहे. रोज अन्नदान असणार आहे याच दरम्यान रात्री नऊ ते 11 यावेळी संजय महाराज पाचपोर, विशाल महाराज खोले, बाळू महाराज गिरगावकर, प्रदीप महाराज नलवडे, पुरुषोत्तम महाराज पाटील ,उमेश महाराज दशरथे यांचे कीर्तन होईल तर शनिवारी सहा मे रोजी मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे काल्याचे किर्तन होणार  असून  महाप्रसादानंतर हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.                                     

        सप्ताह दरम्यान विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून बंकट स्वामी संस्थान कन्यादान करणार आहे यामध्ये जास्तीत जास्त वर -वधू  पित्यांनी नोंदणी करून लाभ घ्यावा असे अवाहन मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे ,विश्वस्त आणि अन्नदान कमिटीने केले आहे.

Video 













Advertise 







मागोवा बातम्यांचा....

 ● जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांचा एसटी बसद्वारे प्रवास


■ MB NEWS चा नवोपक्रम: 'प्रेरक व्यक्तिमत्वावर बोलू काही'* • *आजचे व्यक्तिमत्व*• >>>>>>>>>>>>>>> *श्री. प्रशांत जोशी: 'नेहमी शांत' व 'स्थिरचित्त' व्यक्तिमत्व.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *LIVE: गीता परिवार आयोजित संस्कार शिबीर परळी वैजनाथ.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांचे ६ मे रोजी द्वितीय पुण्यस्मरण ; किर्तन,प्रवचनाचे आयोजन*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !