MB NEWS:पंकजाताई तळ ठोकून ; पॅनलच्या विजयासाठी केली व्यूहरचना

 दहशतमुक्त वातावरणासाठी लोकनेते शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा

पंकजाताई मुंडे यांचं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारांना आवाहन


परळीची बाजार समिती महाराष्ट्रात अव्वल करण्याचा दिला शब्द


परळी वैजनाथ ।दिनांक २७।

कृषी उत्पन्न बाजार समितीत दहशतमुक्त वातावरणाची गरज आहे, ते निर्माण करून बाजार समिती महाराष्ट्रात नंबर एकची करण्यासाठी लोकनेते शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा पॅनलच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी मतदारांना केलं आहे.


    परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या जागेसाठी उद्या २८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते शेतकरी विकास पॅनलने विरोधकांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आवाहन करतांना पंकजाताईंनी म्हटले आहे की, बाजार समितीत दहशतमुक्त वातावरणाची गरज आहे. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, हमाल मापाडी या सर्व घटकांना मला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्याकरिता पोषक वातावरण निर्माण   करून बाजार समितीला अव्वल करण्यासाठी लोकनेते शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करून आम्हाला सेवेची संधी द्यावी.


*या उमेदवारांना करा विजयी*

----------------

या पॅनलमध्ये सोसायटी मतदारसंघातून देहू आघाव, बळीराम गडदे, राजेश गिते, उत्तम माने, श्रीराम मुंडे, भरत सोनवणे, संतोष सोळंके, महिलांमधून शिवकन्या फड, प्रयाग साबळे, भटके विमुक्त प्रवर्गातून सतीश मुंडे, इतर मागासवर्ग मधून केशव माळी, ग्रामपंचायत- श्रीरंग नागरगोजे, वसंत निर्मळ, अनु जाती - कपील चोपडे, आर्थिक दुर्बल- बालासाहेब गुट्टे, व्यापारी मधून जुगलकिशोर लोहिया, नरसिंग सिरसाट तर हमाल मापाडी मधून राजाभाऊ मुंडे यांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांना "छत्री" या चिन्हासमोर मतदान करून विजयी करा असं आवाहन पंकजाताईंनी केलं आहे.


पंकजाताई तळ ठोकून ; पॅनलच्या विजयासाठी केली व्यूहरचना

---------------

पंकजाताई मुंडे गेल्या आठ दिवसांपासून परळीत तळ ठोकून आहेत. लोकनेते शेतकरी विकास पॅनलच्या विजयासाठी त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत व्युहरचना केलेली आहे. मतदारांचा देखील त्यांच्या पॅनलला वाढता पाठिंबा मिळालेला आहे. केवळ परळीच नाही तर अंबाजोगाईसह जिल्हयातील इतर बाजार समित्यांसाठी देखील त्यांनी कठोर मेहनत घेऊन मतदारांना विजयाचं आवाहन केलं आहे.

••••


Video 











Advertise 







मागोवा बातम्यांचा....

 ● जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांचा एसटी बसद्वारे प्रवास


■ MB NEWS चा नवोपक्रम: 'प्रेरक व्यक्तिमत्वावर बोलू काही'* • *आजचे व्यक्तिमत्व*• >>>>>>>>>>>>>>> *श्री. प्रशांत जोशी: 'नेहमी शांत' व 'स्थिरचित्त' व्यक्तिमत्व.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *LIVE: गीता परिवार आयोजित संस्कार शिबीर परळी वैजनाथ.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांचे ६ मे रोजी द्वितीय पुण्यस्मरण ; किर्तन,प्रवचनाचे आयोजन*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !