इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:टोकवाडी येथे भीम शाहीर अशोक निकाळजे यांच्या भीमगीत कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद

 टोकवाडी येथे भीम शाहीर अशोक निकाळजे यांच्या भीमगीत कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद 


परळी / प्रतिनिधी 


परळी तालुक्यातील टोकवाडी येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर त्रिशरण पंचशील घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले



सायंकाळी पाच वाजता गावातील प्रमुख रस्त्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर सायंकाळी तरि तू सल्या बेईमान झाला फेम महाराष्ट्राचे गायक भीमशाहीर अशोक निकाळजे यांच्या प्रबोधन पर भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला


 यावेळी भिम शाहीर अशोक निकाळजे यांनी सखोल प्रबोधन करत गीतांच्या माध्यमातून गावकऱ्यांचे मनोरंजन केले या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते यावेळी बालक बालिका उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Video 









Advertise 







मागोवा बातम्यांचा....

 ● जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांचा एसटी बसद्वारे प्रवास


■ MB NEWS चा नवोपक्रम: 'प्रेरक व्यक्तिमत्वावर बोलू काही'* • *आजचे व्यक्तिमत्व*• >>>>>>>>>>>>>>> *श्री. प्रशांत जोशी: 'नेहमी शांत' व 'स्थिरचित्त' व्यक्तिमत्व.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *LIVE: गीता परिवार आयोजित संस्कार शिबीर परळी वैजनाथ.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांचे ६ मे रोजी द्वितीय पुण्यस्मरण ; किर्तन,प्रवचनाचे आयोजन*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!