बोरखेड येथील शेतातील सौर उर्जा संच कोसळला

शेतकऱ्यांच्या सौर उर्जा संचाचे वादळाने मोठे नुकसान 


बोरखेड येथील शेतातील सौर उर्जा संच कोसळला

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यात दि.25 व 26 मे रोजी आलेल्या वादळात विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. या वादळात शेतकऱ्यांच्या सौर उर्जा संचाचेही वादळाने मोठे नुकसान झाले आहे.

      भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.बोरखेड येथील शेतातील सौर उर्जा संच कोसळल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बोरखेड शिवारातील गट नं.96 मधील विनय सुंदरराव वानखेडे यांच्या शेतातील सौर उर्जा संच, प्लेटस् असे कोसळले आहे.अचानक आलेल्या वादळामुळे संपूर्ण संच उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीची प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मागणी शेतकर्‍याकडून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !