प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

तलवारीने केक कापणे अंगलट; सहा जणांवर गुन्हा दाखल

 तलवारीने केक कापणे अंगलट; सहा जणांवर गुन्हा दाखल




दिंद्रुड:वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापणे एका तरुणाच्या आणि त्याच्या मित्रांच्या अंगलट आले. शस्त्र दाखवून दशहत पसरवल्याप्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माजलगाव तालुक्यातील मोगरा येथे ही घटना घडली.

          अतुल किशन पांढरपोटे या माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील तरुणाचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने मित्रांसह केक कापून वाढदिवस साजरा केला. मात्र, केक कापण्यासाठी त्याने तलवारीचा वापर केला. याबाबतचा फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरही टाकला. यानंतर दिंद्रुड पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी श्रीडोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अतुल किशन पांढरपोटे, महादेव पांढरपोटे, अभिषेक पांढरपोटे, नागेश पांढरपोटे, भैय्या पांढरपोटे आणि ज्ञानेश्वर पांढरपोटे (सर्व रा. मोगरा, ता. माजलगाव) यांच्याविरोधात दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा नंबर 94/2024 कलम 4/25 आर्मी ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले असून आरोपीस अटक करण्यात  आली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या