दुख:द वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली !!!

 कामगार नेते कॉ.प्रा.पंडित मुंडे यांचे निधन

परळी / प्रतिनिधी


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ कामगार नेते कॉ.प्रा.पंडितराव मुंडे प्रदीर्घ आजाराशी झुंज देत अखेर प्राणज्योत मालवली.परळी तालुक्यातील नाथरा येथील मूळचे रहिवासी असलेले प्रा.मुंडे हे हल्ली छत्रपती संभाजी नगर येथे वास्तव्यास होते.


कॉ.प्रा.पंडित मुंडे हे छत्रपती संभाजी नगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात वाणिज्य विभाग प्रमुख पदावरून सेवा निवृत्त झाले होते तर त्याच्या पत्नी श्रीमती सुलभा मुंडे (जाधवर)  ह्या मराठवाडा शिक्षक संघाच्या माजी कार्याध्यक्षा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका राज्य पुरस्कार प्राप्त झालेल्या आहेत.दोन्ही दांपत्य आपल्या कर्तव्यासोबत सामाजिक कार्यात अग्रणी राहून कामगारांसाठी त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे.कॉ.प्रा.पंडित मुंडे यांच्या पार्थिवावर दि 29 रोजी सकाळी 10 वाजता त्याच्या मूळगावी नाथरा ता-परळी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.कॉ.प्रा.पंडित मुंडे यांच्या या निधनाने जेष्ठ कामगार नेता गमावला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार