प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ: सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन मानले आभार!


मुंबई:ब्राह्मण समाजाला  स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून 50 कोटीचा भरभरून निधीही उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आज आभार व्यक्त करण्यात आले.

     महायुती सरकारने काल पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन केले.अनेक दिवसांपासून जिव्हाळ्याचा प्रश्न शासनाने मार्गी लावला.  राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार , प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे ,कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांची भेट घेऊन सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आभार मानले.यावेळी ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव धर्माधिकारी,परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे, ब्राह्मण समाजाचे नेते काकासाहेब कुलकर्णी, भाजप महिला आघाडी प्रदेश प्रकोष्ट डॉ. संजीवनीताई पांडे, शशिकांत बिराजदार, श्रीपाद पाठक आदी  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या