अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

वाचा:डाॅ.दिपक पाठक यांचा विशेष ब्लॉग>>>>>टार्गेट देवेंद्रजीच का???

 टार्गेट देवेंद्रजीच का?????

       द्यस्थितीत आपल्या देशाचे/राज्याचे राजकारण वेगळ्या मार्गाने जात आहे. अलिकडेच लोकसभेचा निकाल लागला. लोकसभेच्या प्रचारादरम्यान "संविधान बदल" त्याचबरोबर "अल्पसंख्यांक असुरक्षित" असे नरेटिव्ह विरोधी पक्षांनी सेट केले आणि त्यामुळे यश मिळाले. सध्याच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तसाच काहीतरी फंडा/टुलकीट महाराष्ट्र विधानसभेसाठी वापरण्याचा विचार केला असणार की ज्यामुळे विधानसभेत अपेक्षित यश मिळेल. 

त्या अनुषंगानेच विरोधी पक्षांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना टार्गेट करण्याचे ठरवलेले दिसते. त्यासाठी कोणताही नेता देवेंद्रजींना टार्गेट करतोय. जस काही विरोधकांना "देवेंद्रफोबिया" नावाचा आजार झाला आहे. या विधानसभेत विरोधक देवेंद्रजींना खलनायकाच्या रूपात दाखवून (खोटा नरेटिव्ह) मतदारांना परत मुर्खात काढणार असे दिसते.  ज्या प्रमाणे मुघल सैनिकांना प्रत्येक ठिकाणी संताजी धनाजी दिसायचे तसे आज विरोधकांना फक्त देवेंद्रजीच दिसत आहेत.


अलिकडेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम मानव यांनी देवेंद्रजी बद्दल गरळ ओकली. हे शाम मानव म्हणजे फक्त हिंदु धर्मातील प्रथा परंपरा कशा अंधश्रद्धा/थोतांड आहेत हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसने पाळलेलं मविआच बांडगूळ आहे. याच्यात हिम्मत असेल तर इतर धर्मात असलेल्या प्रथा/परंपरा यावर बोलून दाखवावे. यांना आपले काम सोडून राजकारणात डोकावण्याची गरज काय? काय तर म्हणे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देवेंद्रजींनी तीनचार कागदावर सह्या केल्या नाहीत म्हणून त्यांना खोट्या प्रकरणात अडकवून अटक केली म्हणे... 

शाम मानवजी, तुमचे नावात "मानव" शब्द आहे. थोडेफार मानवाचे गुण तुमच्या अंगी असतील असा समज होता. साहेब, तीन वर्षे झोपले होता की नशेत होतात? का तुमच्या संस्थेला बाहेरून होणाऱ्या फंडासंबंधीत काही प्रकरणं केंद्र सरकारने चौकशीसाठी घेतल्यामुळे भाजपावर बिनबुडाचे आरोप करताय? 


मविआचे काळातील गृहमंत्री अनिल देशमुख यांना तीन वर्षापूर्वी 100कोटी/महिना वसुली प्रकरणात गुन्हा दाखल होऊन अटक झाली. आज तीन/चार वर्षानंतर त्यांना जाग आली आणि देवेंद्रजीवर आरोप केले. तुम्ही अशी कोणती नशा केली होती की तुम्हाला एवढी वर्षे जागच आली नाही? का खरे प्रकरण उजेडात आले म्हणून डोक्यावर परिणाम झाला होता आणि आता झांज उतरली. याच्या म्हणण्यानुसार 3/4 प्रतिज्ञापत्र देवेंद्रजींनी त्याच्याकडे पाठवले होते म्हणे. त्यावर सह्या करून दिल्यावर तुमच्यावर कारवाई होणार नाही असे सांगितले म्हणे. एकतर त्यावेळेस तुमचीच सत्ता होती, देवेंद्रजी तर विरोधी पक्षात होते. तुम्ही तर गृहमंत्री होता. तरीपण तुमच्याकडे देवेंद्रजींने पाठवलेले 3/4 प्रतिज्ञापत्रे असतानासुद्धा तुम्ही देवेंद्रजीवर कोणतीच कारवाई का केली नाही? आश्चर्य आहे किंवा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. यामध्ये एकतर तुम्ही खोटे बोलताय नाहीतर तुम्ही फक्त सहीपुरते गृहमंत्री होतात, कोणाच्यातरी तालावर नाचत होतात. तुम्ही देवेंद्रजीवर त्याचवेळेस गुन्हा दाखल करणे आवश्यक होते किंवा आज जसे मिडीया समोर येऊन बरळलात तसे त्याचवेळेस बरळायचे. 


तुमच्यावर ED या स्वायत्त संस्थेने गुन्हा दाखल केला होता. देशमुख साहेब तुम्ही निर्दोष असता तर तुमची चौकशी करून सोडले असते पण दोषी आढळल्यामुळेच तुम्हाला अटक झाली. सचिन वाझे याने पण तुमच्यावर पीए च्या माध्यमातून वसुलीचे आरोप केले आहेत तर तुम्ही म्हणता की तो गुन्हेगार आहे. देशमुख साहेब, तुम्ही सुद्धा गुन्हेगारच आहात. आज पण तुरुंगातच असता, पण तुमचे वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव तुम्ही जामीन मिळवला आहे. तो कधीही रद्द होऊ शकतो हे लक्षात असू द्या. तुमच्याकडे पुरावे आहेत ना, मग मिडीयात ओरडण्यापेक्षा हिम्मत असेल तर न्यायालयात जा. तेथून न्याय मिळेल. पेड मिडिया पुढे कागदे नाचवून काही होत नसते. मिडियावर सुद्धा काही निर्बंध असणे आवश्यक आहे. 


तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी आमदार विद्या चव्हाण यांनी तर कहरच केला. त्यांच्या घरगुती वादासाठी देवेंद्रजी यांना जबाबदार धरले आहे. विद्या चव्हाण मॅडम यांनी सुनेला मूल होत नाही म्हणून छळ केला असा आरोप सुनेने केला आहे. असा आरोप करण्यासाठी देवेंद्रजी यांनी सुनेला फूस लावली असे विद्या चव्हाण यांचे म्हणणे आहे. 


इतरही ज्यांची लायकी/औकात नाही असे नेते, काही स्वयंघोषित नेते, सुपारीबहाद्दर नेतेही देवेंद्रजीवर तोंडसुख घेत आहेत. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि देवेंद्रजींची जनतेच्या मनात जी निष्कलंक प्रतिमा आहे त्याला तडा घालून त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात खोटा नरेटिव्ह पसरवून आम्ही किती स्वच्छ आहोत हे दाखविण्याचा निष्फळ प्रयत्न आहे. देवेंद्रजींवर जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांची लायकी काय तर ते गुन्हेगार प्रवृत्तीचे जामिनावर बाहेर असलेले आहेत. 


देवेंद्रजींचे राजकारण सर्वसमावेशक असते. देश/महाराष्ट्राच्या विकासासाठी, जनतेच्या कल्याणासाठी झटणारा माणूस. "देश प्रथम" हे भाजपाचे ब्रीदवाक्य जपणारा तसेच स्वार्थ आणि राजकीय स्वार्थ बाजूस ठेवून काम करणारा कर्तव्यदक्ष माणूस आहे. नेहमी विकास आणि जनहित मनात ठेवून राजकारण करणारे आहेत त्यामुळेच त्यांनी शिक्षण संस्था, साखर कारखाना किंवा एखादी बॅंक काढली नाही. म्हणजे भ्रष्टाचार नाही. 80% समाजकारण आणि20% राजकारण करणारा एकमेव नेता असल्यामुळे जनतेत लोकप्रिय आहेत. त्यांच्या सर्वसमावेशक, जातीविरहित, जनहिताचे, विकासात्मक राजकारणामुळे भ्रष्ट राजकारण्यांच्या डोळयात सलत आहेत. राजकीय विरोधक भरपूर आहेत. विरोधक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. सर्व बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतात. देवेंद्रजी निष्कलंक असल्यामुळे कोणतेच आरोप करता येत नसल्यामुळे भ्रष्ट राजकारणी, त्यांचे चेलेचपाटे, स्वयंघोषित, सुपारीबहाद्दर नेते, लायकी नसलेले नेते आडनावावरून (फडणवीस/जातीवाचक), शारिरीक जाडीवरून पिसाळल्यासारखी टीका करतात. काहीजण तर एवढे नीच मानसिकतेचे आहेत की ते त्यांच्या पत्नीवर खालच्या पातळीवर टीका करतात. आरोप करणाऱ्यांच्या बायकोवर जर तसे आरोप केले तर काय वाटेल याचा विचार त्यांनी केलेला बरा. बहुतेक आरोप करणाऱ्यांसोबत तसे घडले असेल किंवा त्यांचे संस्कार नीच असतील. 


विरोधक एवढे बावचळले आहेत की कोठे काहीही घडले की गृहखात्याचा संबंध असो की नसो, गृहमंत्री देवेंद्रजींच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. असे वाटतेय की देवेंद्रजी गृहमंत्री असल्यामुळे विरोधकांना त्यांच्या (अ)वैध धंद्यामध्ये, भ्रष्टाचार करण्यात बर्‍याच अडचणी येत असतील. म्हणून राजीनाम्याची मागणी करून, चोहोबाजूंनी विरोधात रान पेटवून गृहमंत्री पदावरून खाली खेचणे हा विरोधकांचा एककलमी कार्यक्रम दिसतोय. देवेंद्रजी गृहमंत्री पदावरून पायउतार झाले की विरोधक आणि महाराष्ट्र शांत होईल असे वाटते.


त्याचबरोबर "अकेला देवेंद्र क्या करेगा", पक्षाच्या बैठकीत "शिंदे तुझसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही" तसेच "फक्त देवेंद्रलाच टार्गेट करा" बाकी कोणालाच नको. असे सांगून विरोधकांच्या मनात देवेंद्रजीं बद्दल किती विष आहे हे लक्षात येते. ही सगळी सत्तेसाठी चाललेली तडफड आहे. 

म्हणे देवेंद्रजींनी पक्ष फोडले. अहो तुम्हाला तुमचे नेते सांभाळता आले नाहीत हे सांगा ना. मग आज तुमच्या पक्षात प्रवेश होत आहेत, देवेंद्रजींनी पवारांवर पक्ष फोडला असा आरोप करायचा का?


एवढे नाना प्रकारचे खोटे, अश्लील, बिनबुडाचे आरोप होऊनसुद्धा देवेंद्रजी त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे थोडेसुद्धा डळमळीत न होता इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करतात. सध्याचे देवेंद्रजींचे वावरणे म्हणजे "हाथी चलता है, कुत्ते भौंकते है" असेच आहे. 


देवेंद्रजी एक निष्ठावंत, निष्कलंक, निस्वार्थी, शांत, संयमी, सर्वसमावेशक, विकासाभिमुख, जनहित साधनारे, जातीविरहित राजकारण करणारे असे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेतृत्व आहे. देवेंद्रजींचे राजकारण सर्वसमावेशक असते. त्यांनी मराठा समाजासाठी आरक्षण दिले. तसेच मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरू केले. सारथी संस्थेस भरघोस अनुदान, मोफत वसतिगृह योजना, व्यावसायिक शिक्षण मोफत, राजर्षी छत्रपती शाहूमहाराज शिक्षण शिष्यवृत्ती योजना, परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ई. योजना सुरू केल्या. जवळपास 40 वर्षापासून मराठा समाजाच्या मागण्या इतर मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या नाहीत पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी या मागण्या मान्य करून समाजास न्याय दिला. मराठा आरक्षण हायकोर्टात टिकवले पण सत्ताबदल झाल्यामुळे आणि तत्कालीन मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे देवेंद्रजींनी दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. तसेच इतर समाजासाठी पण भरीव कार्य केले आहे.

असे सर्वसमावेशक नेतृत्व लाभल्यामुळे महाराष्ट्रीयन जनता  भाग्यवान आहे. 


विरोधक अशा सच्चा नेत्यावर चिखलफेक करून बदनाम करत आहेत. पण विरोधकांनी आणि खोटे आरोप करून फेक नरेटिव्ह पसरवणारे यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की देवेंद्रजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुषीत तयार झालेले नेतृत्व आहे. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या राजकीय पारखी नजरेने देवेंद्रजींना हेरून राजकारणात आणले. प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे आणि नितीन गडकरी यांच्या राजकीय तालमीत ताऊन सुलाखून निघालेला हिरा आहे. स्वतःवर टीका झाली तरी प्रत्युत्तर देत नाहीत. लायकी नसलेले, स्वयंघोषित नेत्यांकडे तर ढुंकूनही बघत नाहीत. "बोलायचे नाही पण करणीला चुकायचे नाही" हा गुणधर्म असल्यामुळे टप्प्यात आणून कार्यक्रम करतात. हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. विशेष म्हणजे देवेंद्रजींची बदनामी करून महाराष्ट्रीयन जनतेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवणारे बरेचजण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या केसेस मध्ये जामिनावर बाहेर आहेत. राजकारणाचा उपयोग फक्त भ्रष्टाचार करून संपत्ती जमा करण्यासाठी करतात. देवेंद्रजींमुळे त्यांना अडचण झाल्यामुळे खोटे, गलिच्छ, अश्लील आरोप करून फेक नरेटिव्ह पसरवून जनतेच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण करण्याचे काम विरोधक करत आहेत. पण लोकसभेपासून जनता हुशार झाली आहे. विरोधकांचा डाव जनतेच्या लक्षात आला आहे. जनतेला हित कशात आहे हे समजल्यामुळे जनता देवेंद्रजी पासून तसूभरही बाजुला जाणार नाही हे विरोधकांनी लक्षात घ्यावे.


देवेंद्रजी, महाराष्ट्रात भरपूर पक्ष, भरपूर नेते आहेत. पण मोठ्या प्रमाणात टीका तुमच्यावरच का होते? फेक नरेटिव्ह फक्त तुमच्या बाबतीतच का पसरवले जातात? तुम्ही भ्रष्टाचार विरहित सरकार चालवता म्हणून, की भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत नाही म्हणून, की सर्वसमावेशक, जातीविरहित राजकारण करता म्हणून  की तुम्ही फडणवीस (ब्राह्मण) आहात म्हणून.... लक्षात येत नाही. देवेंद्रजी तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुम्ही राजकारण तर करतातच पण त्यासोबत समाजकारण सुद्धा असते .महाराष्ट्रीयन जनतेचे तारणहार तुम्हीच आहात. जनता तुमच्या पाठीशी उभी आहेच. देवेंद्रजी जनतेच्या भले करण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे. मा. पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी तुमच्याबद्दल "देशाचे नेतृत्व करण्याची धमक असणारा नेता" असे उद्गार काढलेले होते. खचून न जाता ते शब्द सार्थ कराल याबद्दल आम्हाला खात्री आहे. सध्याच्या या दुषित राजकारणातून तुमची सहनशक्ती आणि जनतेचे प्रेम यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर काहीच परिणाम होणार नाही याबद्दल खात्री आहेच. तुमच्या सहनशक्तीला त्रिवार सलाम.... तरीपण महाराष्ट्रीयन जनतेच्या भल्यासाठी आपणास तुमच्यावरील टीका, बदनामी आणि तुमच्याबद्दलचा फेक नरेटिव्ह सहन करण्याची सदैव शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....

✍️ डाॅ. दिपक पाठक.

      परळी वैजनाथ.

टिप्पण्या

  1. Good luck to Mr. Devendra Fadanvis for bright future in Indian politics.

    उत्तर द्याहटवा
  2. Great Sir! I am speechless.What a blog!एक गोष्ट नक्किच जर महाराष्ट्रातुन कोणी पंतप्रधान होईल तर ते देवेंद्र जी.मी हे उघडपणे FB वर बोललोय बर्याच वेळा.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?