इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास दुसर्या दिवशी भाविकांची गर्दी

 आत्मलिंगाची अनुभुती हेच शिवमहापुराण कथेचे सार -प.पु.कनकेश्वरी देवीजी

शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास दुसर्या दिवशी भाविकांची गर्दी

परळी (प्रतिनिधी)

 शिवकथा ही मनुष्याला त्याग करायला शिकवते.शिवमहापुराण आत्मलिंगाची अनुभुती देते आणि हेच शिवमहापुराण कथेचे सार असल्याचे प्रतिपादन श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पु.माता कनकेश्वरी देवीजींनी केले.परळी येथील हालगे गार्डन येथे येथे महाशिवपुराण ज्ञानयज्ञात दुसरे पुष्प गुंफताना बोलत होत्या.

 परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात गुरुवार दि.७ नोव्हेंबर रोजी माता कनकेश्वरी देवीजी कथेचे दुसरे पुष्प आपल्या सुमधुर वाणीतुन व संगीताच्या साथीने गुंफताना माता कनकेश्वरी देवीजी यांनी शिवमहापुराण कथेचे महत्व सांगताना आधुनिक काळात जीवन जगत असताना दान देणारा व दान स्विकारणारा कसा असावा यावर सविस्तर विमोचन केले.शरीर आत्म्याचा आधार नसुन आत्मा शरीराचा आधार आहे.हे जेव्हा समजेल तेव्हा शिवालयात प्रवेश झाला असे समजावे.परंतु आपण शरीरालाच आधार समजतो.ज्याला ही गोष्ट समजली त्याच्या अंगी शिवाचा वास असतो.जग बुध्दीमान,गुणवंत दात्यांच्या प्रभावात असले तरी ज्याला दुनियाकडुन काहीच अपेक्षीत नाही त्याला फक्त परमार्थ प्रभावित करत असतो.शंकर हा शब्द सगुन साकार रुपासाठी असुन,ते सद्गुरू रुपी आहेत.या महापुरुषांजवळ शिष्य,दास म्हणुन जावे लागते.आत्मलिंगाची अनुभुती हेच शिवमहापुराण कथेचे सार आहे.कलियुगाच्या प्रभावातून इतरांना वाचवण्यापेक्षा स्वतःला त्यापासून दुर ठेवणं हेच योग्य असुन अनेक जण इतरांना सुधारण्याच्या नादात स्वतः बिघडत असतात असे सांगितले.

       या कथेचा भाविकांनी श्रवण करुन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सौ.जयश्रीताई प्रभु कोरे हिंपळनेकर,लातुर व पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ शिवकथा समिती,परळी वैजनाथ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या