इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...
हवेत फायरिंग प्रकरणी आरोपी अटकेत; रिव्हॉल्व्हर अन् जिवंत काडतूस जप्त

 परळी : मागील वर्षी दिवाळी दरम्यान परळीच्या  बँक कॉलनीतील घराजवळ वाहन पूजा करत असताना एका तरुणाने रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायरिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कैलास फड ( रा. कन्हेरवाडी .हल्ली मुक्काम बँक कॉलनी परळी) याच्या परळी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यास आज दुपारी पोलिसांनी अटक केली. यावेळी गुन्हयातील रिव्हॉल्व्हर, २३ जिवंत काडतूस व २ पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान, आरोपीस परळी न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
       याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी  की, रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायर होत असल्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओची पोलिसांनी पडताळणी केली त्यात मागील दिवाळीत परळी शहरातील बँक कॉलनी भागातील युवक कार्यकर्ते  कैलास फड यांनी 12 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी वाहनाची पूजा करत असताना त्यांच्या जवळील रिव्हॉल्व्हर वरच्या दिशेने हवेत फायर केले असल्याचे खात्री पोलिसांना पटली .हवेत फायर करतानाचा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी पोलीस  अंमलदार विष्णू फड यांना 23 डिसेंबर रोजी सूचना  दिल्या होत्या. व्हिडिओमध्ये  कैलास फड  हा हवेत फायर करत असल्याचा खात्री झाली. त्यामुळे याप्रकरणी 23 डिसेंबर  2024रोजी त्याच्या  विरोधात परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्या नंतर तीन दिवसांनी कैलास फड यास परळी शहर पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती गुरुवारी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी दिली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या