इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

खळबळजनक व दहशत निर्माण करणारी घटना !

अंबाजोगाईत गोळीबार; व्यापाऱ्यावरील हल्ल्यानंतर दुसरी खळबळजनक घटना

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

   अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात असलेल्या माऊली नगर मध्ये रहात असलेल्या नवनाथ कदम यांच्या मुलावर  एका युवकाने गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नसले तरी या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

    संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्हा राज्यातच नव्हे तर देशात गाजत असताना आणि अंबाजोगाई शहरात दोन दिवसांपूर्वीच सुजित सोनी या व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटण्याची घटना ताजी आहे.त्यानंतर आज शहरातील मोरेवाडी परिसरात असलेल्या माऊली नगर मध्ये  रहात असलेल्या नवनाथ कदम यांच्या सिद्धेश्वर या मुलावर रेणापूर तालुक्यातील एका युवकाने गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यात  कौटंबिक वादाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे.सतत धमकी प्रकरणी काही दिवसा पूर्वी गोळीबार करणाऱ्या या युवकाविरुद्ध  शहर पोलीस स्टेशन ला तक्रार ही देण्यात आलेली असल्याची माहिती आहे.  आज सकाळी तो कदम यांच्या घरी आला आणि वाद घालत कदम यांच्या सिद्धेश्वर या मुलावर गोळीबार केला. सुदैवाने ही गोळी त्याला लागली नाही व मोठा अनर्थ टळला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आसून तपास कामी फॉरेन्सिक टीम ला पाचारण करण्यात आले आसल्याचे वृत्त आहे. अधिक तपास पो. नि. विनोद घोळवे हे अधिक तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या