विद्यार्थी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक सोहळा !!!

लिटल स्टार इंग्लिश स्कूल, द्रोणाचार्य- राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलचे  १४ फेब्रुवारीला वार्षिक स्नेहसंमेलन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीचे अनुसरण करणाऱ्या परळीतील अग्रेसर लिटल स्टार इंग्लिश स्कूल, द्रोणाचार्य- राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलचे  १४ फेब्रुवारीला वार्षिक स्नेहसंमेलन  आयोजित करण्यात आले आहे.मदर टेरेसा सेवाभावी संस्था, परळी वै. या संस्थेचे हे १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन आहे.
        मदर टेरेसा सेवाभावी संस्था, परळी वै. संचलित लिटल स्टार इंग्लिश स्कूल, द्रोणाचार्य- राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलचे  १४ फेब्रुवारीला दुपारी ३ वा. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. समारंभास अध्यक्षस्थानी वैद्यनाथ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रामलिंग राजनाळे हे राहणार आहेत. तर संस्थेचे  सचिव प्रभु बागल सर, लोणीचे सरपंच भरत सोनवणे,  राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे सचिव अनिल जाधव, एमबी न्यूज तथा दै पुढारीचे पत्रकार प्रा.रविंद्र जोशी, सरपंच विजय राठोड, एनडीटिव्ही मराठीचे रिपोर्टर स्वानंद पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या स्नेहसंमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्या सौ.मनिषा बागल मॅडम , प्राचार्या सौ. आरसुळे मॅडम ,उपप्राचार्या सौ.जोशी मॅडम, सहाय्यक चिल्लरगे मॅडम,सातपुते मॅडम, औटी मॅडम, लासे मॅडम, भुजबळ मॅडम व सर्व शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार