इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

 परळी व अंबाजोगाई तालुक्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेंतर्गत 933  लाभार्थ्यांना ३ कोटी १० लक्ष रूपयांचा निधी वितरीत

आ.धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांचे श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्थेची सहाय्यक संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले आभार


आ.धनंजय मुंडे व ना.पंकजाताई मुंडे यांनी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो बेघर, बेसहारा अनाथांच्या डोळ्यातील पुसले अश्रु!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदार संघाचे आ.धनंजय मुंडे व मंत्री पकजाताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या महिला व बाल विकास खात्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या एकल पालकांच्या मुला-मुलांनी व दिव्यांगांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर स्वयंसेवी संस्था श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ व अंबाजोगाई यांची निवड झाली होती. या संस्थेच्या माध्यमातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेंतर्गत 933  लाभार्थ्यांना 3 कोटी 10 लक्ष रूपयांचा निधी खात्यात जमा करण्यात आला. आ.धनंजय मुंडे व ना.पंकजाताई मुंडे यांचे श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सचिन मुंडे व सहाय्यक संस्थाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.आ.धनंजय मुंडे व ना.पंकजाताई मुंडे यांनी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो बेघर, बेसहारा अनाथांच्या डोळ्यातील अश्रु पुसले आहेत. 

       याबाबत अधिक माहिती अशी की, परळी व अंबाजोगाई तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत एकल पालकांच्या मुली - मुलांना वयाच्या १ ते 18 वर्षापर्यंत अनुदान मिळते. कोरोना काळात ज्यांचे आई-वडील वारले आहेत. अशा पालकांच्या सर्व मुली-मुलांना तर ज्यांची आई किंवा वडील यांचे निधन झाले आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत दिव्यांग मुलांचाही समावेश आहे. या योजनेसाठी श्री संत भगवान बाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ या संस्थेची सहाय्यक संस्था म्हणून निवड करण्यात आली होती. या संस्थेच्या माध्यमातून लाभार्थीचे अर्ज भरून घेऊन ९३३ लाभार्थीचे ३ कोटी १० लक्ष रुपये वितरीत करण्यात आले. 

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना एक अत्यंत उपयुक्त योजना आहे, जी अनाथ, बेघर आणि असुरक्षित मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते. या योजनेमुळे मुलांना योग्य संरक्षण, काळजी आणि विकासाच्या संधी मिळतात, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते. या योजनेमुळे अनेक मुलांना शिक्षण आणि योग्य पालन-पोषण मिळणार आहे.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परळी व अंबाजोगाई तालुका स्तरावर श्री संत भगवान बाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ या संस्थेची स्वयंसेवी संस्थेस्था म्हणून निवड झाली होती. या संस्थेच्या माध्यमातून ९३३ लाभार्थी खात्यात निधी जमा झाला आहे. यासाठी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तसेच मंत्री पंकजाताई मुंडे व महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे मार्गदर्शन मिळाले.


_*संस्थेचे तळमळीने काम...*_


        बाल संगोपनाच्या क्षेत्रामध्ये संस्था गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने तळमळीने काम करत असून संस्थेच्या माध्यमातून 933 लाभार्थ्यांना खात्यामध्ये निधी जमा झाला याबद्दल संस्थेच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


ना.पंकजाताई व आ.धनंजय मुंडे यांचे पाठबळ

       दरम्यान राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांनी संस्थेच्या पाठीशी आपले पाठबळ उभे केले. संस्थेच्या या कामाला आशीर्वाद देत त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळेच या संस्थेच्या माध्यमातून वंचित व बेसहारा, गरजू मुलांना लाभ मिळवून देता आला. 933 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला. मुलांना शिक्षण आणि योग्य पालन पोषण या माध्यमातून मिळणार आहे. याबद्दल ना. पंकजाताई मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांचे मनापासून  या संस्थेने आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या