प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

Balochistan : पाकिस्तानचा तुकडा पडला, बलुचिस्तान आता स्वतंत्र देश; बलुच नेत्याने केली मोठी घोषणा

बलुचिस्तानने पाकिस्तानपासून स्वतःला वेगळं करत स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं आहे. राज्यात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या हिंसाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यावरून बलुच नेते मीर यार बलोच यांनी बुधवारी पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा केली. ते म्हणाले की, बलुचिस्तान पाकिस्तान नाही. त्यांनी हिंदुस्थान आणि जागतिक समुदायाकडून स्वातंत्र्यासाठी पाठिंबा मागितला आहे.मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि लिहिले की, "आम्ही आमचे स्वातंत्र्य मिळवले आहे. पाकिस्तानची दहशतवादी व्यवस्था आता कोसळणार आहे. हिंदुस्थानी सरकारने बलुचिस्तानला दिल्लीत अधिकृत कार्यालय आणि दूतावास उघडण्याची परवानगी द्यावी." ते म्हणाले की, बलुच स्वातंत्र्यसैनिकांनी डेरा बुगतीच्या गॅस क्षेत्रांवर हल्ला केला आहे, जे पाकिस्तानच्या प्रमुख गॅस पुरवठ्याचे केंद्र आहे.मीर यार बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांकडेही आवाहन केलं आहे की, संयुक्त राष्ट्रांनी ताबडतोब बलुचिस्तानात शांतता दल पाठवावे आणि आपल्या जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रातून पाकिस्तानी सैन्य हटवावे. त्यांनी मागणी केली की, पाकिस्तानी सैन्याची सर्व मालमत्ता बलुचिस्तानला सोपवावी आणि सर्व गैर-बलूच सैनिक, आयएसआय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ हा प्रदेश सोडावा. ते म्हणाले आहेत की, लवकरच एक अंतरिम बलोच सरकार स्थापन केली जाईल. ज्यामध्ये महिलांनाही प्रतिनिधित्व मिळेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या