प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

भिषण आपघात.......

 दुचाकीला वाचवताना एर्टिगा कार पलटून तीन ठार तर चार जण गंभीर जखमी

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- 

       दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एर्टिगा कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर चार जण गंभीरित्या जखमी झाल्याची  घटना आज दुपारी अंबाजोगाई आडस रोडवरील उमराई पाटी नजीक घडली.

        माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथून एम एच 05 सी व्ही 9186 या इर्टिगा गाडी मधून अंबाजोगाई कडे एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी एक मुस्लिम कुटुंब येत असताना आडस अंबाजोगाई रोडवरील उमराई पाटील नजीक असलेल्या दत्त मंदिर समोर एक दुचाकीस्वार अचानक आडवा आल्याने या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात  चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि एर्टिगा जागेवर पलटी झाली.  गाडीतून प्रवास करत असलेले  शौकत अहमद शेख (वय 46) व खय्युम अब्बास अत्तार (वय 45) हे दोघे  जागीच ठार झाले असून आरेफ जागीरदार, नवाब मिया शेख, वाजेद आबेद मोमीन, खाजा अमीर शेख, शरीफ इस्माईल मोमीन हे पाच जण गंभीरित्या जखमी झाले असून सर्व जखमींना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आसुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

       दरम्यान ही घटना होताच दुचाकी स्वार आपल्या दुचाकीसह घटनास्थळावरून फरार झाला असून जखमीं पैकी आणखी एका जखमीची प्रकृती चिंताजनक होती . दरम्यान उपचारादरम्यान तिसऱ्या व्यक्तीचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे  पाथरूड गावावर शोककळा पसरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या