नारळाचे झाड लावण्याचा उपक्रमात सहभागी न झाल्याचे कारण

गावातील वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाले नाही :घरावर दगडफेक व कुटुंबाला जमावाकडून मारहाण 

नारळाचे झाड लावण्याचा उपक्रमात सहभागी न झाल्याचे कारण


बीड , प्रतिनिधी: गाव स्वच्छता व गावात नारळांचे झाडे लावण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला नाही म्हणून घरावर दडगफेक करुन कुटूंबियांना मारहाण केल्याची घटना तालुक्यातील आदर्श गाव वंजारवाडीत घडली. जखमी तांदळे कुटूंबियांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घरावर दगडफेक करुन मारहाण केल्याचा आरोप कुंडलिक तांदळे यांनी केला आहे. 


आपण नातेवाईकांच्या लग्नासाठी नेकनूरला गेल्याने मोहिमेत सहभागी झालो नाही. रात्री आपल्याला दंड मागण्यात आला. आपण नातेवाईकांचे लग्न असल्याचे सांगीतल्यांनतर लई माज आलाय असे म्हणून घरावर दगडफेक करण्यात आली. यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असल्याचा आरोपही कुंडलिक तांदळे यांनी केला. यामध्ये कुंडलिक साहेबराव तांदळे, श्रीराम कुंडलिक तांदळे (वय ५५), प्रयागा श्रीराम तांदळे (वय ५०), संगीता कुंडलिक तांदळे (वय ३१), सरस्वती साहेबराव तांदळे (वय ७५) जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार