इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

पोलीसांचा सर्व पातळ्यांवर तपास.....!

नवा ट्विस्ट; दोन दिवसांपूर्वी परळीत एकाला उचलले; अपहरणाचा गुन्हाही दाखल मात्र खरच अपहरण की अन्य काही कारण ?

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
           गेल्या दोन दिवसांपूर्वी परळीच्या मुख्य रस्त्यावरून सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास एका इसमाला चार ते पाच लोकांनी पांढऱ्या इनोव्हा गाडीत उचलून घेऊन गेल्याचा प्रकार पुढे आला होता. याप्रकरणी अपहरण करण्यात आल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला. परळी पोलिस याचा तपासही करत आहेत. मात्र आपहरण करण्यासाठीच्या जवळपास सर्वच पैलूंची पडताळणी केली असता ठोस मुद्दा समोर आलेलाच नाही त्यामुळे आता खरोखरच हे अपहरण झाले की अन्य काही प्रशासकीय  तपास, पोलीस प्रक्रिया आदी कारणांसाठी घेऊन गेले असे तर्क वर्तवण्यात येत आहेत. तसेच असेच काहीतरी असण्याची शक्यता आहे का यादृष्टीनेही  पोलीस आता तपास करीत आहेत.
            दिनांक 06/05/2025 रोजी सायंकाळी 5.45 वाजण्याचे सुमारास राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक ते गणेशपार रोड या मुख्य रस्त्यावरील एका हाँटेल जवळून पिडीत इसम नामें शेख अमजेद अहमद शेख वय 35 वर्ष रा. बरकत नगर परळी वै यास अनोळखी पाच ते सहा लोकांनी पकडुन रोडवर उभ्या केलेल्या पांढर्‍या रंगाच्या ईन्व्हा गाडी मध्ये बळजबरीणे टाकुन घेवुन गेले अशी फिर्याद देण्यात आली. यावरुन पो.स्टे.संभाजीनगर परळी वै. येथे तात्काळ गुन्ह्याची नोंदही करण्यात आली. मात्र प्रथमदर्शनी या इसमाची पार्श्वभूमी तपासली असता त्याचे आपहरण व्हावे या पातळीचे कोणतेच ठोस कारण पुढे आलेले नाही. पिडीत इसम हा टेलरकाम करणारा असल्याची माहिती मिळाली.कारागिर म्हणून टेलरिंगची कामे तो करतो.त्यामुळे या अपहरणाचे कारण शोधणे उत्सुकतेचे ठरले आहे.
        पोलीस दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्व बाबींची पडताळणी करत आहेत.या गुन्ह्य़ाचा जलदगतीने तपास सुरु आहे.मात्र प्राथमिक पातळीवर सध्यातरी हे अपहरणच झाले या दृष्टिने तपास सुरु असला तरी अन्य बाबींची पडताळणी व शक्यता लक्षात घेवूनही तपास सुरु आहे. दरम्यान खरोखरच हे अपहरण झाले की अन्य काही प्रशासकीय कारणास्तव, चौकशी, तपास, पोलीस प्रक्रिया आदी कारणांसाठी या इसमाला घेऊन गेले असे तर्क वर्तवण्यात येत आहेत. तसेच असे काही असण्याची शक्यता आहे का यादृष्टीनेही  पोलीस आता तपास करीत आहेत. नेमका प्रकार काय हे पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असले तरी पोलीस सर्व पातळ्यांवर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या